रायगड फोटोग्राफर असोसिएशनच्या जिल्हध्यक्षपदी समीर भायदे तर उपाध्यक्षपदी समीर मालोदै
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

रायगड फोटोग्राफर असोसिएशनच्या जिल्हध्यक्षपदी समीर भायदे तर उपाध्यक्षपदी समीर मालोदै
दोन्हीही पदाधिका-यांची बिनविरोध निवड
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग (दि २१) : रायगड फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा जागतीक छायाचित्र दिनी अलिबाग येथील हॉटेल गुरुप्रसाद सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी रायगड जिल्ह्यातील छायाचित्रकारांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या रायगड फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी समीर भायदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तद्वतच उपाध्यक्षपदी समीर मालोदे आणि जयंत आर्ते, कार्याध्यक्षपदी विवेक सुभेकर, सचिव आनंद निंबरे, सहसचिव मनोज भोईर, खजिनदार जितू मेहता, सहखजिनदार सुशील घाटवळ, सल्लागार निलेश शिर्के व प्रकाश कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून अविनाश राऊत, प्रसाद पाटील, प्रशांत गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे रायगड जिल्ह्यातील फोटोग्राफर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील फोटोग्राफर एकजुटीने काम करतील आणि फोटोग्राफी व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात फोटोग्राफी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. नवीन कॅमेरे, ड्रोन फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, डिजिटल एडिटिंग, सोशल मीडिया तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. या बदलत्या काळानुसार रायगडमधील फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आवश्यक सहकार्य मिळावे. यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे.
रायगड जिल्ह्यात फोटोग्राफी क्षेत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकारांना एकत्रित आणणे, त्यांच्या अडचणी शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, फोटोग्राफर बांधवांच्या व्यावसायिक हिताचे संरक्षण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात फोटोग्राफी क्षेत्रातील बदलांचा स्वीकार करून छायाचित्रकारांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
फोटोग्राफर बांधवांच्या एकजुटीसाठी आणि त्यांच्या व्यवसायाला अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे समीर भायदे यांनी सांगितले. तसेच संघटनेतील प्रत्येक सदस्याला सोबत घेऊन सर्वांच्या हितासाठी काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.



