
0
4
0
9
0
3
पैसा झाला खोटा
ये रे ये रे पावसा
तुला देईल पैसा
पाऊस काही येईना
पैशासाठी रूसेना
लावली खूप झाडे
केले त्यांचे संवर्धन
ढग जमले आकाशात
सुरू झाल बरसणं
पाऊस आला झाडांनी
पैसा झाला खोटा
मुलांना आता समजले
पाऊस सा-यात मोठा
आम्ही आता पावसाला
नाही दाखवणार लोभ
खुप खुप बरसेल तो
वृक्षांचा जुळता योग
काळ्या काळ्या ढगांनी
आकाशात केली गर्दी
खुप खुप बरसला तो
असा पाऊस दर्दी
श्रीम.सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
========
0
4
0
9
0
3





