Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताखानदेशचारोळीदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“समजून घेतांना केवळ मीच का”?; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 0 9 0 1

“समजून घेतांना केवळ मीच का”?; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“आई तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च खूप आहे. तू ताण नको घेऊ, तुझी माझ्यामुळे धावपळ होते”.
अशा हृदय द्रावक चिठ्ठीतून आपल्या भावनांना वाट देत नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेल्या नाशिकच्या पूजाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. एका दुसऱ्या घटनेत अहिल्यानगरची रहिवासी असलेली सोळा वर्षाची तरुणी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथे राहत होती. तिने पंख्याला ओढणी बांधून जीवनयात्रा सुरू होण्यापूर्वीच संपवली तिही कायमची.

एका बाजूला कुंभमेळ्याची तयारी करत असलेल्या,सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या माझ्या नाशिक शहरातल्या या घटना वाचून मन सुन्न झाले. अशा घटना केवळ नाशिक मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र,भारतात सातत्याने घडत आहेत. विचारांती मला असे वाटले मुलांना “समजून घेताना” आम्ही कमी तर नाही पडलो??? हो मला माहित आहे…. समजून घेतांना चुकला म्हणून बापाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवणारा कुपुत्रही मी पाहिला.

समजून घेतांना चुकला म्हणून जन्म देणाऱ्या आईचा खून करणारा मी येथे पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसामध्ये झाला हा आनंद मला आहे, पण त्याच किल्ल्यांवर चुन्याने स्वतःची नावं लिहून विद्रूप करणारे महाराजांचा त्याग समजून घेताना चुकले, याचं दुःखही माझ्या अंतकरणाला आहे. अनाथ स्त्रीला गवताच्या गंजीत पेटवून स्व-मृत्यूचा बनाव रचणारी स्री..स्रीजन्म समजून घेतांना अपयशी ठरली या वेदनाही अनुभवल्यात. एकमेकाला समजून घेण्याच्या त्या दिवसात हनीमूनच्या निमित्ताने मेघालय येथे जाऊन नवऱ्याचा खून करणारे नराधम पण मी वाचलेत.

विचारांच्या या चक्रात अजून काय पाहायचं बाकी आहे ? हे समजून घेतांना मी वैचारिक थकली आणि…. समजून घेतांना केवळ मीच का?? या प्रश्नाचं उत्तर खूप शोधलं….परंतु हा अनुत्तरीत प्रश्न कायमच राहिला माझ्या मनात…. समजून घेताना गरज आहे..जवळच्या आणि दूरच्या व्यक्तीच्या भावना, विचार व दृष्टिकोन यांच्या अभ्यासाची, परिस्थिती समजून घेण्याची, विषय समजूनच बोलण्याची, कला आहे तर कले मागची भावना जाणून घेण्याची. तसं पाहता…. समजून घेतांना म्हणजे माहितीपूर्ण, ज्ञानात्मक आणि भावनात्मक नजरेतून सारं काही जाणून समजून घेणं होय. मराठीचे शिलेदार समूह….खऱ्या अर्थाने मराठी नव साहित्यिकांना समजून घेणार एक हक्काचं व्यासपीठ..

आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी समजून घेतांना हा विषय दिला. खरंतर या विषयाला काव्यात बांधणे हे सर्व कवी कवियत्री यांच्यापुढे एक मोठं आव्हान होतं. वैचारिक प्रगल्भता, काव्य क्षेत्रातील अनुभव संपन्नता अन् विषयाला आपलंसं करण्याची कला याच्या जोरावर आपल्यापैकी कित्येक कवी कवयित्रींनी विषयाला न्याय देतांना विविध अंगी कवितांनी सर्वच समूह खूप छान सजवलेत. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन ….

पण थोडं काही…… लेखनात सातत्य असेल तर, नवसंकल्पनांचे सर्जन आपोआपच होतं, अर्थात यास वाचनाची जोड असेल तर तुमच्या कल्पनांना आभाळही अपूर्ण पडतं हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. सातत्यपूर्ण वाचा,लिहा…व्यक्त व्हा.. पुन्हा एकदा तुम्हास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद…!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

4.2/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे