मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक:राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : गंमत जंमत📘*
*🔸मंगळवार : २२ / जुलै /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गंमत जमत*
गंमत जमंत ऐका ले
गंमत जमंत ऐका ले…!!धु!!
घलात आमच्या चोल शिलला
त्याचा आम्ही हात धलला
ललायला लागला पलायला
धलुन ठेवला रे…!!१!! गंमत जमंत…
अले अले चोला पलतोस काय
आईच्या पाया पलतोस काय
बाबांच्या पाया पलतोस काय
ललायला लागला पलायला
धलुन ठेवला रे…!!२!! गंमत जमंत…
अले अले चोला पलतोस काय
काकांच्या पाया पलतोस काय
काकूच्या पाया पलतोस काय
ललायला लागला पलायला
धलुन ठेवला रे…!!३!! गंमत जमंत…
अले अले चोला पलतोस काय
मामाच्या पाया पलतोस काय
मामीच्या पाया पलतोस काय
ललायला लागला पलायला
धलुन ठेवला रे…!!४!! गंमत जमंत…
अले अले चोला पलतोस काय
दादाच्या पाया पलतोस काय
वहिनीच्या पाया पलतोस काय
ललायला लागला पलायला
धलुन ठेवला रे…!!५!! गंमत जमंत…
चोल गेला पलुन चोल गेला पलुन….
*सौ माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
गंमत जंमत खेळ
हा लहानपणीचा
लगोरी बाल खेळ
हा मुला मुलींचा
लहान पणाची आठवण
अजूनही आहे लक्षात
एकमेकाला मारू बाल
देऊ बाल एकमेकाच्या हातात
उडून जायची धांदल
खूप यायची गंमत जंमत
एकमेकावर जायचे धाऊन
खूप यायची रंगत
ज्यावर यायची घण
त्यावर द्यायची दन
लगोरी मांडून पटकन
जायचे लवकर पळून
मुलं मुली करायची मजा
आनंद व्हायचा व्दिगुणित
खेळ लघोरीचा संपला की
आपापल्या जायचे वर्गात
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गमंत जमंत*
उजळणीची ऐका गमंत जमंत
गुरूजी शिकवतात,गाणी म्हणत..
एक उभा सरळ सावधान
दोनचे उंदरासारखे शेपूट छान..
तीनचा कोणी पिळला कान
चारची बघा वेगळीच शान…
मांडी घालून बसला पाच
जसा सर्वात शहाणा हाच..
सहा तीन चा भाऊ जुळा
उलट सुलट दोघांचे कान पिळा..
सात नुसता आळशी गोळा
पाटीवर तो लोळ लोळ लोळला..
आठ उलटी आजोबांची काठी
ऐकलं नाही तर पडते पाठी..
नऊ दिसतो जशी हत्तीची सोंड
मला दिसते त्यात गणोबाचे तोंड..
चेंडू नी बॅट सारखा दिसतो दहा
सर्वात मोठा म्हणून त्याचे नखरे पहा..
लिहिता लिहिता संपला तास
गमंत जमंत करतं झाला अभ्यास..
हसत खेळत शिकलो आकड्यांची गाणी..
सगळ्यांना पाठ झाली आजचं उजळणी…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गंमत जंमत*
गंमत जंमत करूया सारे
गंमत जंमत करूया
या जगण्याच्या सोहळ्याचे
स्वागत आपण करूया
आईच्या कुशीत असते
माझ्या स्वप्नांचे लेणे
बाबांच्या पाठकुळीवर
मग ऐटीमध्ये बसणे
कसे फेडू दोघांच्या
मी उपकाराचे देणे
लाडाने त्यांच्या गाली
गोड पापी देऊया
गंमत जंमत करूया सारे
गंमत जंमत करुया
शाळेत शिकुनीशहाणा
होईन मी रे दादा
मोठे होऊनी कर्तुत्वाचा
करतो मी रे वादा
आजीकडे माझ्यासाठी
असतो संस्कारांचा बटवा
आजोबांच्या तोंडून आपल्या
इतिहासाला आठवा
शूरवीरांच्या कथा ऐकुनी
गुण त्यांचे गाऊया
गंमत जंमत करूया सारे
गंमत जंमत करूया
विज्ञानाच्या पंखामध्ये
भरले गणिताचे बळ
मेहनतीनेच मिळेल
मला यशाचे फळ
डोळे भरून पाहुया
हे देवाजीचे जग
आपल्या जगण्यात
भरूया सारे उज्वल रंग
अभिमानाने या जन्माचे
आपण कौतुक करूया
गंमत जंमत करूया सारे
गंमत जंमत करूया
*शबनम मुबारक काझी
*ता.आष्टी ,जिल्हा बीड*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
शाळा आमची खूप खूप भारी
रोजच असते तिथे मजाच सारी
शाळा भरताना घंटा वाजते घण घण
पोरांच्या आवाजाने गजबजते शाळेचे अंगण..
गुरुजी शिकवू लागतात धडे आणि कविता
पक्याच्या पोटात यायला लागतो गोळा
मग गुरुजी शिकवतात बे एक बे, बे दुणे चार
हळूहळू सारीच पोरं होऊ लागतात पसार
पोटात कावळे करू लागतात काव काव
पोरं सारी घेतात डब्याकडे धाव
आईने दिलेल्या भाजीची चवच असते न्यारी
खाऊन झाल्यावर चॉकलेट आणायला पळते स्वारी
खेळाच्या तासाला सगळीकडे एकच धावपळ
आऊट होताच पक्या काढू लागतो पळ
शाळा सुटायच्या वेळेला गुरुजींचा पारा वाढतो प्रत्येकाला एक एक धपाटा घालता जीव शांत होतो
अशा आमच्या शाळेत रोजच असते गंमत जंमत
म्हणूनच सुट्ट्या लागतात तेव्हा आम्हाला नाही करमत
*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
दुपारच्या वेळी
वाजली बेल
जेवणाची झाली
लगेचच वेळ
धावत पळत
पकडली जागा
बाई म्हणाली
शिस्तीत वागा
गंमत जंमत
बसली पंगत
मित्र मैत्रीणींची
आवडली संगत
ताटात आला
वाटाणा भात
जेवण केलेत
आम्ही हर्षात
खेळ खेळलो
मैदानात छान
बाईच्या हाकेस
दिला मग मान
वर्गात पटकन
बसलोय आम्ही
गृहपाठ लेखन
करतोय नेहमी
लाभतो आम्हा
बाईचा सहवास
शाळेचा दिवस
असतोच खास
*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
रविवार दिवस असतो खास
शाळेला सुट्टी खेळाचा तास…
लंगडी, लगोरी, खो-खो खेळू
धम्माल मस्ती गवतावर लोळू…
रिमझिम पाऊस ओली माती
मातीचे आकार बनवूया किती…
वहीचा कागद खुबीने फाडू
कागदी नाव पाण्यात सोडू…
ताई दादांची मदत घेऊ
ओल्या मातीत रोपे लावू…
गंमत जंमत शिकूया सारे
आपण सारी हसरी मुले…
*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
डिंग डिंग डिंग डिंग
मामा नगरात आला
उंच इमारती बघुन
मामा चकित झाला
डिंग डिंग डिंग डिंग
मामाची बायको रुसली
रागे रागे कोपऱ्यात
तोंड खुपसून बसली
डिंग डिंग डिंग डिंग
मामांनी वडा खाल्ला
घाई घाई खाताना
पोटात हल्ला झाला
डिंग डिंग डिंग डिंग
मामांनी सुखामेवा आणला
गंमत जंमत करत
सा-या मुलांनी ताव मारला
डिंग डिंग डिंग डिंग……..
*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
सर्कशीत गेले , गंपू चिंपू
गंमत जंमत, गंमत जंमत…
एवढा मोठा ऐरावत
आला सायकल चालवत
हँडल मोडला, सीट तुटली
गेला घंटी वाजवत
गंमत जंमत, गंमत जंमत ….||१||
घोडे धावले, खबडक खबडक
लोकांना पाहून खिंकाळत
टापा टाकीत टाकीत
सादर केली सुंदर कवायत
गंमत जंमत, गंमत जंमत….||२||
मध्येच येतो जादूगार
फुलांचे पक्षी करी तयार
कानातून काढतो पाण्याची धार
मुलगी गायब डब्यातून पार
गंमत जंमत, गंमत जंमत….||३||
बुटक्या विदूषकाची मौज भारी
करामती बघून हसली सारी
हसता हसता पोट दुखले
झगा सावरत विदूषक पळाले
गंमत जंमत, गंमत जंमत….||४||
विदूषक अडकला वाघोबाच्या पिंजऱ्यात
वाघोबाच्या मास्तरांची नव्हती खबरबात
असा सापडला विदूषक संकटात
दोरीवरच्या मित्राने उचलून नेले आकाशात
गंमत जंमत, गंमत जंमत…..||५||
*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
नाचू खेळू गाऊ
चला गंमत जंमत करू
राजा बनू कोणी शिपाई
चोरांना मग धरू
गाणी गोष्टी नाटक
चौफेर फुगडी धरू
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
गरगर गरगर फिरू
एक दोन तीन चार
लपंडाव खेळू
राज तुझे राज माझे
लटकेच आपण भांडू
चिंचा बोरे आवळे कवट
शिवारी साऱ्या हिंडू
माळरानी गुरे चारत
खेळू विटी दांडू
शुरांच्या कथा ऐकू
शूरवीर आम्ही बनू
भारत मातेसाठी
देशभक्ती अंगी बानू
शाळा शिकू मोठे होऊ
सजग नागरिक घडू
माता अन् मातृभूमीचे
रक्षक आम्ही बनू
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
*गंमत जंमत*
गंमत जंमत झाली बाबा गंमत जंमत झाली
राणा मनात खेळायला पाखरे आली खाली…
मोर फुलवून पिसारा येरझऱ्या घालतो
काळा काळा कावळा काव काव करतो ….
चिऊ चिऊ चिमणी नाच करू लागली
रानातील फुलांवर फिरून खूष झाली..
या रे या मुलांनो पाखरे पाहयला
रानावनात नाचायला आणि बागडायला…
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🌨️⛺♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖





