Breaking
नागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

नागपूर मेट्रोच्या व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

आता व्हॉट्सऍप द्वारे प्राप्त करा मेट्रो तिकीट

0 1 8 3 0 9

नागपूर मेट्रोच्या व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

आता व्हॉट्सऍप द्वारे प्राप्त करा मेट्रो तिकीट

नागपूर : दररोज व नियमितपणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून या वाढत्या रायडरशिप मध्ये कॅशलेस व्यवहारला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याच शृखंलेत महा मेट्रोने नवीन व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे शुभारंभ आज मा.केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार श्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार श्री. मोहन मते, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री.श्रावण हर्डीकर,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपा आयुक्त श्री.अभिजित चौधरी,महा मेट्रोचे संचालक(स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग)श्री.अनिल कोकाटे,संचालक (प्रकल्प) श्री. राजीव त्यागी उपस्थित होते.

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक

विज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती होत असून त्या मध्यमाने नवीन तंत्रज्ञान देखील नित्य-नेमाने उपलब्ध होत आहे. समाजातील तरुण आणि विद्यार्थी वर्ग या नवीन आयुधांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून या वर्गाने विशेषतः मह मेट्रोच्या या व्हाट्सएप तिकीट प्रणालीचा वापर करावा असे आवाहन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर यांनी केले.

दररोज सुमारे ४०% मेट्रो प्रवासी मोबाइल ऍप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डसह सारख्या अनेक पर्यायाचा वापर करतात त्यामध्ये व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीच्या माध्यमाने आणखी भर घालण्यात आली आहे. महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. आतापर्यंत ८५ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी महाकार्ड प्राप्त केले असून आहेत.सरासरी प्रतिदन १०० महा कार्ड खरेदी करत आहे. या व्यतिरिक्त पेमेंट करण्याकरिता क्यूआर कोडचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे.

त्यासोबतच महा मेट्रो द्वारे दर शनिवार आणि रविवारी महा मेट्रो मेट्रो प्रवाशांसाठी भाड्यात 30 टक्के सवलत महा मेट्रोच्या वतीने देण्यात येत असून या व्यतिरिक्त राजपत्रित सुटयांचा दिवशी देखील 30% सवलत मेट्रो प्रवाश्याना देण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 0 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे