पाऊसधारा’ कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘कवयित्री सविता धमगाये’
‘पाऊसधारा’ कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘कवयित्री सविता धमगाये’
कवी संमेलनात ‘पंख पैजंण’ कथासंग्रहाचे प्रकाशन
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउदेशीय संस्था नागपूरच्या वतीने दि २३ जून २०२४ रविवार रोजी दुपारी ३.०० ते ६.०० पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित निमंत्रितांच्या ‘पाऊसधारा’ कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या प्रसिद्धी कवयित्री ‘सविता धमगाये’ यांची निवड करण्यात आली आहे.
‘मराठीचे शिलेदार’ संस्थेचे अध्यक्ष संस्थापक, प्रकाशक, संपादक राहुल पाटील यांनी संमेलनाध्यक्षा सविता धमगाये यांना निवड झाल्याचे पत्र दिले आहे. ‘पाऊसधारा’ कवी संमेलनाचे आयोजन मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या साप्ताहिक साहित्यगंध, बिनधास्त न्यूज पोर्टल व नागपूरचे ‘बी एस फोर’ न्यूज चैनल यांच्या सौजन्याने संपन्न होणार आहे.
‘पाऊसधारा’ या कवी संमेलनात मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या आगामी ‘पंख पैंजण’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. नागपूरच्या प्रसिद्ध कथाकार, लेखिका व कवयित्री ‘कुसुमलता वाकडे’ यांचा ‘पंख पैंजण’ हा कथासंग्रह असून आपल्या आयुष्यातील स्वानुभव त्यांनी या संग्रहात मांडलेले आहेत.
आयोजित पुस्तक प्रकाशन व निमंत्रिताच्या कवी संमेलनास अध्यक्षा सविता धमगाये, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध लेखक डॉ अनिल पावशेकर, रत्नाकर तिडके, संस्थेचे विश्वस्त अरविंद उरकुडे, समाजसेवक नितेश क्षीरसागर, बी एस फोर न्यूजचे संपादक सूरज भिलकर, शिरसाठ मैडम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.