जुनी पेन्शन आमरण उपोषणास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा; जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार
जिल्हा प्रतिनिधी, वर्धा
जुनी पेन्शन आमरण उपोषणास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा; जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार
महाराष्ट्रातील एकूण 16 पदाधिकारी उपोषणाला बसलेत
जिल्हा प्रतिनिधी, वर्धा
वर्धा: येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक 2 ऑक्टोबर 2024 पासून “बेमुदत आमरण उपोषण’ आरंभलेले आहे. उपोषण सभा मंडपास कास्ट्राईब शिक्षक संघटनेनेसुद्धा भेट देऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा पाठिंबा असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांनी जाहीर केले.
जुनी पेन्शन उपोषणाला महाराष्ट्रातील एकूण 16 पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रतिनिधी आले असून, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा वर्धा चे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार, जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील, श्रीकृष्ण भस्मे , प्रवीण हुमने, आर पी थुल, नितेश काळपांडे जयदीप जुमडे, सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कोल्हापूर मधून जुनी पेन्शन विभागाचे कोल्हापूर येथून आलेले विक्रम राजपूत जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, प्रमोद खोडे यांचीही भेट घेऊन सदर आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.