‘बाप्पा आमचा आणि आम्ही…एक आठवण’
'बाप्पा माझा' अभिनव स्पर्धेतील ५ विजेत्यांना वार्षिक सभासदत्व
‘बाप्पा आमचा आणि आम्ही…एक आठवण’
कुटुंबासह ‘माझा बाप्पा’ अविस्मरणीय क्षणाचे सोबती
‘साप्ताहिक साहित्यगंध’ तर्फे गणेशभक्तांना आवाहन
‘बाप्पा माझा’ अभिनव स्पर्धेतील ५ विजेत्यांना वार्षिक सभासदत्व
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: मराठीचे शिलेदार संस्थेचे मुखपत्र असलेल्या प्रसिद्ध ‘साप्ताहिक साहित्यगंध’ च्या पुढील अंकात राज्यातील तमाम गणेशभक्तांसाठी ‘बाप्पा आमचा आणि आम्ही…एक आठवण’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी पाच ते सात दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, आज गणेशमूर्तीची स्थापना झाल्यापासून ‘बाप्पा’ व कुटुंबासह व आप्तेष्टाच्या संगतीने एक छायाचित्र सर्वांच्या नावासह मुख्य संपादक राहुल पाटील 7385363088 यावर पाठवावे.
साहित्यगंधच्या पुढील अंकात सहभागी सर्व गणेशभक्तांना कौटुंबिक छायाचित्रासह स्थान देण्यात येईल. करिता छायाचित्र पाठवण्यासाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात आले आहे. रू ५० रू सहभाग शुल्क म्हणून ‘मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूर’ फोन पे, गुगल पे 9834739798 यावर जमा करून स्क्रीन शाॉट पाठवावा.
‘बाप्पा माझा’ ही एक स्पर्धा असून, रंगरंगोटी, उत्कृष्ट सजावट व गणेशमूर्तीची निवड अशा निकषावर विजेत्या ५ स्पर्धकांना ‘मराठीचे शिलेदार संस्थेचे’ २०२५-२०२६ वार्षिक सभासदत्व व सहभागी सन्मानपत्र देण्यात येईल.
‘बाप्पा माझा’ या अभिनव स्पर्धेत सहभागी होऊन साहित्यगंध अंकात स्थान प्राप्त करण्यासाठी मुख्य संपादक राहुल पाटील 9834739798 व पत्रकार रजत डेकाटे 9322911285 यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेचे सभासद असलेल्यांना सहभाग सन्मापत्र डिजीटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल.



