Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरराजकियविदर्भ

ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी घेतली नितीन गडकरींची महत्त्वपूर्ण भेट

राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी

0 5 4 7 2 3

ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी घेतली नितीन गडकरींची महत्त्वपूर्ण भेट

राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि २४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. डॉ. राजीवजी पोतदार यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी या शिष्टमंडळाने केली.

नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात डॉ. पोतदार यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याचा, पक्षनिष्ठेचा तसेच संघटन उभारणीत दिलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा विचार करून त्यांना विधानपरिषदेत संधी दिल्यास पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवेदनाचे गांभीर्याने ऐकून घेतले व योग्य त्या स्तरावर याबाबत विचार केला जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असून, आगामी काळात उमेदवारीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रसंगी मनोहर कुंभारे, सौ. उज्वलाताई बोढारे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे