0
4
8
2
9
0
संशयात्मक
वागणं तुझ संशयात्मक
मन होते डामाडौल
बाहेर एक,अंदर एक
बोलण्यात गोलमटोल
लोपलय तुझंं प्रेम जणू
निखळ हसणं आनंदात
दिसतो सदा तू चिंतेत
व्यक्त होत नाही सर्वात
लोपलं जणू घराचं
घरपण तुझ्या वागण्याने
घर होतं भरलेल आपलं
हर्षभरीत स्वर्गसुखाने
नको कुणाच्या बोलण्यावर
विश्वास ठेवू हृदयाने
घरफोडे असतात अनेक
टाळ त्यांना गांभिर्याने
नंदनवन अपुल्या घराचे
होईल अपुल्या एकत्वाने
संशयात्मक वृत्ती सोडून
जीवन जगू या आनंदाने
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
0
4
8
2
9
0



