अ. ता. शि. प्र. मंडळ ही दर्जेदार शिक्षण संस्था
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अ. ता. शि. प्र. मंडळ ही दर्जेदार शिक्षण संस्था
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि १८): संस्थाध्यक्ष बळवंत वालेकर अलिबाग (१६) पारतँत्र्यकाळात खेडोपाडी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महात्मा गाँधींचा आ देश प्रमाण मानून मुंबई विधानसभेचे माजी सभापती नानासाहेब कुंटे , विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष वामनराव लिमये , अलिबागचे नगराध्यक्ष भाऊसाहेब लेले , स्वातंत्र्य सैनिक ग. भा. पँडित , बंडूभाई म्हात्रे , द. शं. गोडबोले इ. नी दि १५/ ११/ १९३७ रोजी अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. व वाडगाव येथे पहिली राष्ट्रीयशाळा सुरू केली.
या संस्थेच्या तालुक्यात ५२ प्राथमिक शाळा तसेच सःस्कार केंद्रे होती . आता फक्त ९ अनुदानित शाळा चालू आहेत . या संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे . पूर्वी तुटपुंजा वेतनात “, डिव्होटी” स्वरुपात काम करून शैक्षणिकदर्जा उंचावला. म्हणून विद्यार्थी संख्याही वाढू लागली . तसेच या संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनू लागले . स्पर्धेच्या युगात आजही हा दर्जा कायम आहे . विद्यार्थी संख्येत वाढ होत असून विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनत आहेत . गतवर्षी या संस्थेच्या भाल प्राथमिक शाळेतील विद्यार्थी रुद्र पवार शिष्यवृत्तीधारक बनला, शिवाय त्याची केंद्र शासनाचे नवोदय विद्यालय निजामपूर (माणगाव) येथे निवड झाली आहे.
स्पर्धेचे युग व सर्वत्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा,असूनही शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढत आहे असे प्रतिपादन या संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांनी केले. सदर संस्थेच्या वर्धापनदिनी ते शिशुविहार प्राथमिक शाळेत बोलत होते. स्वागत गीत व ईशस्तवन विद्यार्थ्यांनी म्हटल्यानंतर मान्यवरांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
त्यानंतर संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीबाबात संस्थेचे सेक्रेटरी द. ल. माळवी व भोवाळे प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक विजय नांदगावकर यांची भाषणे झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पनासे यांनी केले तर आभार शिशुविहारच्या मुख्याध्यापिका सौ. कल्याणी वेखंडे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रसिध्द लैखाधिकारी दिलीप देवळेकर , जांभूळपाडा मुख्याध्यापक सिताराम जाधव , भोवाळे मुख्याध्यापकृ विजय नांदददगावकर , वढाव मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील , उसर मुख्याध्यापक शिवाजी दराडे , पवेळे मुख्याध्यापिका सौ. साधना पाटील , शिशुविहार मुख्यध्यापिका सौ. कल्याणी वेखंडे, कार्ले मुख्याध्यापक समीर पाटील , सहा. शिक्षक सौ. मानसी राऊत , सौ. जाग्रुती , सौ. मनिषा धसाडे , सौ रेश्मा वारगे , मंगेशा आपणकर , विलास पनासे , सौ. नंदादेवी पाटील , श्रीम. रुपा गजानन कोळी तसेच बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते .





