नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास येथे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अलिबाग: (दि १८) भारत सरकार तर्फे मादक पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्याकरीता आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टिकोनातून नशामुक्त भारत अभियानाची दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरुवात करण्यात आलेली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या दुरुपयोगांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. नशामुक्त भारत अभियानाला पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत.
मंगळवार दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत या अभियानाची माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुरुपयोगाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण केली. सकाळ सत्रात उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तसेच दुपार सत्रात माध्यमिक विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



