मराठीचे शिलेदार” समूहासाठी आभारीय मनोगत; डॉ. संजय पाचभाई
आभारीय मनोगत
“मराठीचे शिलेदार” समूहासाठी आभारीय मनोगत; डॉ. संजय पाचभाई
माझ्या ‘भेट शेवटची’ या त्रिवेणी काव्याला सर्वोत्कृष्ट स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे खूप खूप आभार.
भाबड्या मनाला/ उत्कृष्टची गोडी
तेही नसे थोडी/ प्रारंभाला
इचीबयीन चार मयन्यापासून मले मतीमंद नावाचा रोग जडला कायबी लिवाले गेलो तवा आशय शून्य. पक्का पागल झालो जी मणूणसन्यान मी मोर्चा चारोळी आणं त्रिवेणी कडं मोडला आणं का चमत्कार झाला मणूण सांगू चारोळी बी सर्वोत्कृष्ट आणं त्रिवेणी बी. बूडत्याले काडीचा का कायचा आधार मणते ना तसं झालं राजे हो.
तसं पावाले गेलं तं भेट शेवटची पयले आली, पण तेथला आशय आणं मायी जिंदगाणी यामंदी जमीन आसमानाचा फरक हाहे आता तूमी मणाण कसा तं तेबी तूमाले सांगतो ..
कालेजामंदी चार वरीस पिरम आणं तिच्यासंगच लगीण आता लगीण होवून चौतीस वरीस झाले मणजे अडतीस वरीस टोटल, तीचं मायेर बी येथलंच मणूणसन्यान आमाले विरह का का मणते तो सोसाच लागला नायी. कोटं बायेरगावी गेलो तरी संगस जेवण करून फिराले गेलो तरी संगस मंग तूमीच सांगा विरह आला कोटूण?
पण तूमी आपले मणूण सांगतो कोणाले सांगजो नोका माया बायकोले तं मुद्दाम नायी. कवा कवा वाटते ना का आपल्याले बी जरासी स्पेस का का मणते ते पायजे. तूमाले बी वाटत असण पण तुमी भेता, मी नाय भेत एकगण तिले सिद्दा मणलो मले एकांत पायजे तवा असी डफरली मायावर का सांगता सोय नायी पक्की इतरपितरच काडली तिनं असो तूमी बी कवा एकांत मांगू नका..
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह



