मु.का.अ. विनायक महामुनी’ यांनी घेतला विद्यार्थ्यासोबत मध्यान्ह भोजनाचा आस्वाद
रजत डेकाटे, प्रतिनिधी
‘मु.का.अ. विनायक महामुनी’ यांनी घेतला विद्यार्थ्यासोबत मध्यान्ह भोजनाचा आस्वाद
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरवा येथील विद्यार्थ्यांशी हितगूज
रजत डेकाटे, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ मौदा: (दि ३१ डिसे.): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आढावा घेण्याकरिता दिनांक 30 डिसेंबर 2025 ला मा. विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व मा. कपिल कलोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मौदा गटविकास अधिकारी डॉ. महेश बेहेकर यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरवा केंद्र बोरगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेत असलेल्या भौतिक सुविधा, उपलब्ध असलेली शैक्षणिक व डिजिटल साधने, स्वच्छतागृह व हॅन्ड वॉश स्टेशन इत्यादी सोबतच विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा सुद्धा आढावा घेतला.
शाळेत असलेली परसबाग त्यातील भाजीपाल्याचा दररोजच्या आहारात केला जाणारा उपयोग, स्वयंपाक खोलीची व भांड्यांची स्वच्छता, वापरण्यात येणारा धान्यसाठा इत्यादी चा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना जेव्हा मध्यान्ह भोजना करता सुट्टी झाली तेव्हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आपल्या सोबत असलेल्या सर्व अधिकारी यांच्यासोबत चक्क विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून विद्यार्थ्यांना मिळत असलेला आहार स्वतः ग्रहण करून आहाराची चव तपासली. विद्यार्थ्यांना पिण्यास मिळत असलेले पाणी स्वतः पिऊन त्यांनी पाणी शुद्ध असल्याची खात्री केली.
यावेळी शाळेतील शिक्षिका व केंद्रप्रमुख श्री जुगलकिशोर बोरकर यांनीसुद्धा भोजन वितरित करण्यात आनंदाने मदत केली. यावेळी त्यांनी स्वयंपाकी आणि मदतनीस यांची चविष्ट जेवण शिजविले जात असल्याबाबत स्तुती केली आणि मुख्याध्यापिका सौ सुवर्ण ठोंबरे यांना चव रजिस्टर मागवून त्या रजिस्टरवर अन्न चवदार असल्याची नोंद घेतली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मौदा श्री संकेत मरसकोल्हे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ ललिता चामट, केंद्रप्रमुख बोरगाव श्री जुगलकिशोर बोरकर, व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.याच प्रमाणे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारोडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानला येथे सुद्धा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी चौधरी व शिक्षक श्री महेंद्र हेडाऊ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.



