Breaking
ई-पेपरकवितानांदेडमराठवाडासाहित्यगंध

बंडाचा दंडा

बळवंत शेषेराव डावकरे

0 4 8 2 9 0

बंडाचा दंडा

सत्तेच्या सारीपाटात
हरवलीय नीतीमत्ता
पाहिजे असते नेत्याना
पद पैसा खुर्ची नि सत्ता

मी एकनिष्ठ म्हणणारे
उगारतात बंडाचा दंडा
काठी मात्र असते तीच
बदलतात फक्त झेंडा

वाजता बिगुल निवडणुकीचा
लागती डोहाळे राजसत्तेचे
उगवती छत्र्या पावसाळ्यात
तसे होते दर्शन नेतेमंडळींचे

तिकीटवाटपाचा संपेना तिढा
जुन्यानव्यांचा ना बसे मेळ
केली हौशे गवशे नवशे यांनी
विविध पक्षांची एकत्रितपणे भेळ

दृष्टी भविष्यवेधी विकासाची
जपावे लोकाभिमुख नेतृत्व
जातीपातीच्या तोडून भींती
पहावे उमेदवाराचे कार्यकर्तृत्व

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे