सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : दर्पणात मी 📘*
*🔸सोमवार : १० / मार्च /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*दर्पणात मी*
दर्पणात मी आजवरी कितीदा
बाह्य सौन्दर्यच न्याहाळले
आत्मदर्शन होऊ दे एकदा..
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
अनोळखी वाटतो चेहरा
दर्पणात मी पाहताना
भाव डोळ्यात गहिरा….
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
दर्पणात मी मला पाहिले
क्षणभर तुझेच अस्तित्व भासले
पण तू कुठेच नव्हतास
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
मन दर्पणात मी पाहता काळीज हंबरले
या घनगर्द संसारात गुरफटलेली दिसले
तोडून पाश अंतर्बाह्य मी जगेन नवउमेदीने
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
रोज तू माझ्या आठवणीत असतोस
स्वप्नातही नित्य तूच प्रिया दिसतोस
तुझ्या हृदय दर्पणात मी आहे ना?
*सौ प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६१ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿
*दर्पणात मी*
दर्पणात मी पाहीले तुला
तुझे खरे रूप दिसले मला
तुला पाहून आरसाही तडकला
*सौ.सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
दर्पणात मी कशाला पाहू गं
मीच माझ्या रुपाची राणी गं
दुसऱ्याहून काय देणेघेणे मला
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
पाहून दर्पणात मी न्याहाळते
हेच का खरे रूप ते
ज्याचा मी गर्व करिते
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
दर्पणात मी बघतांना
स्वतःशीच हितगुजते
मी माझी होवून जगते….
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
साजशृंगार लेवून मी
लाजून बघते दर्पणात मी
वसेल का तव हृदयात मी
*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
दर्पणात मी पाहता मन माझे बोलले
तुझे रुप सर्वाना वेड लावते
पण अंतरंगाचे तुज दर्शन कधी जाहले?
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
*दर्पणात मी*
दर्पणात मी पाहू कशाला
सुंदरच समजते मी स्वतःला
अतिशयोक्ती समजा हवी तर … .
*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📕🔹📕➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



