Breaking
ई-पेपरकवितासाहित्यगंध

दिपावली

संग्राम कुमठेकर ता.अहमदपूर जि.लातूर

0 6 3 9 6 0

दिपावली

आली आली गं दिपावली
वाट पाहते गं माऊली
मायबापाची गं मी लाडकी
मला गं लागतीया उचकी

सकाळी दादाची लगबग
आईच्या जीवाची तगमग
आला आला गं भाऊराया
कंठात दाटलीया गं माया

कासावीस झालाय गं सखा
निरखून पाहतोय सारखा
उरात करतंय गं धडधड
दादाची निघण्याची गडबड

विरहाचे पाहून नयनी दुःख
विसरतील पोटाचीच भूक
जीव गुंतलाय गं सासरी
कान्हा वाजवतोय गं बासरी

माहेरी जाण्याची गं बाई
मला गं लागलीय घाई
वाट पाहत असेल उपाशी
सकाळपासून गं माझी आई

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 6 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे