गिझर जिल्ह्यातील ए.सी. गल्लीत बर्फाच्या फँक्टरीला आग..!!
अंजू प्रमोद येवले उमरेड जिल्हा नागपूर

गिझर जिल्ह्यातील ए.सी. गल्लीत बर्फाच्या फँक्टरीला आग..!!
विनोद नगर: शहरातील ‘कुल कुल’ फँक्टरीला आग लागली. आजूबाजूला आवाज झाला. अचानक दुपारी बर्फाच्या फँक्टरीला आग लागली. जो तो नागरिक धावूधावू जात होते. आगीने सगळीकडे हाहाकार माजला. फँक्टरी धूर सोडत होती. आग सर्वांकडे चालली होती; पण नेमकं काय झालं? कुणालाच कळत नव्हतं? जोतो आपल्याच तालात होता.
अग्निशमन दल पाण्याची फवारणी करू लागले. धूर पुन्हा निघत होता .आग गेली कुठे कुठेच दिसेना बर्फ वितळून पाणी पाणी झाले जणू कुल कुल फँक्टरी ऐवजी पाणी पाणी पाणी फँक्टरीचे नावच झाले. फँक्टरी मालकाचे लई नुकसान झाले ..जो तो पाहून अवाक् झाले. बर्फ सारे वितळले, काही मुले बर्फाच्या तुकड्यावर बसून फिरत होती. थंड्या थंड्या पाण्यात भिजवून कुणी नाचती, कुणी सेल्फी काढत पडत होती. बाजुला होता ‘मोमोज’ वाला, पिझ्झा बर्गर खाण्यासाठी म्हणे गर्दी, मला दे दे करत दोघां गिऱ्हाईकांने केली हाणामारी. अन् काय सांगू बर्फाच्या फँक्टरीला आग लागली. म्हणून बोंबाबोंब झाली. ठिणगी ऊडून फँक्टरीला लागूनच असलेल्या टायरच्या दुकानाला आग लागली . त्यामुळे बर्फ वितळून पाणी झाले. जो तो धावू लागले सारेच हैराण झाले, जिवीतहानी नाही झाली.
“बर्फाच्या फँक्टरीला आग लागली
गावभर चर्चेचा विषय ठरला आहे,
आग कशी लागली चौकशी सुरूच
आहे. आजच्या बातम्या संपल्या..”
अंजू प्रमोद येवले
उमरेड जिल्हा नागपूर
=========



