0
4
8
2
8
4
साजणाच्या मिठीत
गंधाळलेल्या रात्रीसवे,
तू माझ्या मिठीत ये ना…
स्पर्शांच्या नाजूक वाऱ्यांत,
श्वासांची चाहूल दे ना…
चंद्र साक्षीला राहू दे मूक,
झुळूक हळवी सांगू दे हूक,
ओठांवरती थरथर थोडी,
भावनांना वाहू दे आपसुक…
सळसळत्या केसांमध्ये,
बोटांची लकेर पेरू दे रे…
मृदुल ओठांच्या काठांवर,
पावसासारखं सांडू दे रे…
चढू दे कैफ प्रणयाचा
बेधुंद होवू दे सारी रात
तृप्तीची मधूर लहर
अनुभवू दे नखशिखांत…
रातराणीचा सुगंध जाई,
तू माझ्या कुशीस येईपर्यंत,
साजण, अशा पहाटेसाठी,
ही रात्र गहाण अजूनपर्यंत…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
0
4
8
2
8
4



