महात्मा फुले जयंती निमित्त ‘आसमान फाउंडेशन’तर्फे अग्निशामक यंत्रांचे वाटप
नागपूर शहर प्रतिनिधी
महात्मा फुले जयंती निमित्त ‘आसमान फाउंडेशन’तर्फे अग्निशामक यंत्रांचे वाटप
अंध, मूक-बधिर शाळा आणि मुलींच्या वसतिगृहांना अग्निशामक यंत्रांचे वाटप करण्यात आले
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि १२) महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने ‘आसमान फाउंडेशन’ (नागपूर) च्या वतीने वर्धा येथील विविध संस्थांना ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध शाळा, शारदा मूक-बधिर शाळा, उषाकाल मुलींचे वसतिगृह आणि श्रीछाया मुलांचे वसतिगृह यांचा समावेश आहे, सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशामक यंत्रांचे वाटप करण्यात आले.
‘शारदा कला आणि सांस्कृतिक मंडळ, वर्धा’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमा दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या समारंभात, दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागतगीत सादर केले. ‘आसमान फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. रवी गि-हे यांनी, दिव्यांग व्यक्तींची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, अशा व्यक्तींची सेवा करणाऱ्या सर्व निवासी संस्थांमध्ये अग्निसुरक्षा उपकरणांची नितांत गरज असल्याचे अधोरेखित केले.
तसेच या कार्यात सहकार्य करण्यास ‘आसमान फाउंडेशन’ सदैव तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत डॉ. उषाताई फाले (अध्यक्षा, शारदा कला आणि सांस्कृतिक मंडळ) यांनी, तसेच शाखा प्रमुख आशिष खोडे, प्रकाश नरवारे, अर्चना बालामवार, सुवर्णा बारोकर आणि पंकज रंगारी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लोखंडे यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. याप्रसंगी श्यामचंद्र (शाखा प्रमुख, आसमान फाउंडेशन, वर्धा), दिनेश टेकाडे, नंदकिशोर राजुरकर, नरेश जगोजी, मेघा गिरहे (अध्यक्षा, आसमान महिला पतसंस्था), तसेच संबंधित शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.



