Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सत्याग्रह का नको “?

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 9 4

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सत्याग्रह का नको “?

परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘समाजाच्या उद्धारासाठी एका माणसाला एका युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे’.माझे काही मार्ग यशस्वी झाले काही झाले नसतील. पण, माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे. सर्वीकडे आता बोधगया येथील महाबोधी महाविहार आमच्याकडे सुपूर्द करावा असे बौध्दजनाचे मत आहे आणि ते योग्यच आहे. ज्याप्रमाणे मंदिरात पुजारी, चर्चमध्ये फादर तर मस्जिद मध्ये मौलाना नमाज करतात. मग बोधगया महाविहार ब्राह्मणाकडेच का ? बोधगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौध्दाचे तीर्थस्थळ आहे. त्याचे व्यवस्थापन मात्र बौध्दांच्या हातात नाही. यासाठी आंदोलन सुरू आहे. जगभरातील बौध्दाची नजर भारताकडे लागली आहे. गेल्या 12 फेब्रुवारीपासून बौध्द उपासक आणि भिक्कू बिहारमधील जगप्रसिद्ध बौध्द तीर्थक्षेत्र बोधगया येथे आंदोलन करीत आहेत. ‘बीटी कायदा’ म्हणजेच बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची बौद्धांची मागणी जोर धरत आहे.

डॉ.बाबासाहेब म्हणतात, ‘माझा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनात एक प्रकारचे आव्हान होते’. या उच्चवर्णीय हिंदूनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले, तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही. हाच एक प्रश्न या मंदिर- प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होत आहे. मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असे नाही. आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे. त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पुजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही. माणसाला माणूस म्हणून वागवावे, माणसाला माणूसकीचे अधिकार घावेत, मानवतेची प्रतिष्ठापना करावी, या नवयुगातील उच्चप्रेरणा हिंदू मन मानावयास तयार आहे की नाही ? याचीच कसोटी लागणार आहे.

मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू तर नयेत. पण, ती सर्वस्वी बंदच करावी. ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो हे मोठे नवलाईचे व आश्चर्याचेच वाटले. डॉ. बाबासाहेब म्हणतात मला हे सांगताना जरा भीतीच वाटते. मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली तिचे ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजाअर्चा करीत बसावे व त्यामुळेच आपणाला मोक्ष मिळेल अशी त्यांनी समजूत करून घेऊन जीवन जगत राहावे हे नव्हे. तशी माझी कधीच समजूत नव्हती. अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्कांची जाणीव उत्पन्न व्हावी, हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे. कारण या सत्याग्रहामुळे अस्पृश्य लोकांत मानवी हक्काबद्ल इर्षा व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. याची पुढची पायरी म्हणजेच अस्पृश्यांनी शिक्षणप्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. आणि त्यासाठीच अस्पृश्यांनी सुवर्ण हिंदूना या कामाला प्रवृत्त करण्यासाठी आपले हक्क मिळवण्यासाठी झगडत राहावेत. बाबासाहेब म्हणतात, ‘जी आपली असेल व सहज मिळत नसेल, तरच त्यांकरीता भांडूण मिळवून घेणे हा आपला अधिकार आहे’.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे