शब्दपुष्प आभाराची’; प्रतिमा नंदेश्वर
आनंदाने क्षण हे फुलले
‘शब्दपुष्प आभाराची’; प्रतिमा नंदेश्वर
आनंदाने क्षण हे फुलले
रेखाटले मी बालकाव्य ते
मुख्य परीक्षकास भावले
सर्वोत्कृष्टने मज गौरविले
आनंदाने क्षण हे फुलले
‘तुमचा फोटो पाठवा’. हा आनंदात भिजवणारा आ. राहुल सरांचा मॅनेज मी रात्रीच बघितला आणि क्षणाचाही विलंब न करता लगेच फोटो पाठवला. मनात उत्सुकता वाढली होती कुठली रचना आली असावी बालकाव्य तर आले नसेल असे मनोमन वाटत होते. सकाळीच मी सर्व समूह न्याहाळत असतांना जे मनात योजले अगदी तेच घडले. माझे बालकाव्य सर्वोत्कृष्ट पोस्टरमध्ये समूहात झळकले होते.थोडा वेळ आनंदसागरात बुडाल्याचा जणू भास झाला.
काल आ. राहूल सरांनी ‘बालकाव्य’समूहात ‘माकडाचे घर’ हा मजेशीर विषय दिला होता.माकडे घर जरी बांधत नसले तरी, ते टोळीने कधी झाडावर कधी गावात तर कधी शेतात कुठे ना कुठे त्यांना वास्तव्यास राहवे लागते. रोजच त्याचे स्थलांतर असते.हाच विचार करून मी रचना केले. खूप दिवसांनी बालकाव्य रेखाटले.. मुख्य परीक्षकांनी माझ्या शब्दांची दखल घेत योग्य न्याय दिला. शिलेदारांप्रती ऋणभार कोणत्या शब्दात व्यक्त करू कळेनासे झाले. शिलेदार समूहाच्या सदैव मी ऋणाईत..!!
जिथे मी शब्द वेचले शब्द रचले, कवयित्री म्हणून मिरवले अंतरातील विचार, सुख, दु:ख शब्दात व्यक्त केले;असे ज्ञानपीठ शब्दांचा खजिना असलेले हक्काचे व्यासपीठ तसेच प्रेमळ, आपुलकी, जिव्हाळा याने ओतप्रोत भरलेला परिपूर्ण असा समूह म्हणजेच आपला शिलेदार परिवार होय. या नावाजलेल्या सातासमुद्रापार ख्याती असलेल्या समूहाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान वाटतो..!
माझ्या ‘माकडाचे घर’ या विषयावरील रचनेला सर्वोत्कृष्ट सन्मान देऊन मला गौरवण्यात आले त्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे आधारवड, कल्पवृक्ष, देवांश, कवी, लेखक, आदर्श शिक्षक, समीक्षक, साहित्यगंध अंकाचे मुख्य संपादक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आमचे लाडके आ. राहुल सर, मुख्य परीक्षक साहित्यगंध अंकाच्या कार्यकारी संपादक, समीक्षक आदर्श शिक्षिका उत्तम कवयित्री आ. सविताताई, मुख्य परीक्षक साहित्यगंध अंकाच्या मुख्य सहसंपादक आदर्श शिक्षिका उत्तम कवयित्री मुख्य सहप्रशासक आ. वैशालीताई,आ, स्वातीताई, आ सुधाताई,आ.तारकाताई आ. शर्मिलाताई, त्रिवेणी समुहाच्या मुख्य मार्गदर्शिका आ. वृंदाताई, हायकू तज्ञ आ विष्णू दादा,आ. संग्राम दादा, उरकुडे सर, लांडगे दादा, हंसराज दादा, बन्सोड दादा सर्व कार्यकारी प्रशासकीय टिमचे हृदयस्थ आभार व धन्यवाद. माझ्यावर अभिनंदनीय शब्दसुमनांचा वर्षाव करणाऱ्या समूहातील प्रिय दादा, ताईंचे मनपूर्वक धन्यवाद.
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह