0
4
8
2
9
0
आनंद तो सुगंधापरी
परोपकाराने पसरते
आत्मिक समाधान उरी
दरवळे दाहिदिशांना
आनंद तो सुगंधापरी
कुणाचे पुसावे अश्रू
कुणा सहानुभूती द्यावी
या सत्कर्मांनी होईल
सुखद अनुभूती अंतरी
जर भेटे कुणी भुकेला
तर द्यावे अन्न तयासी
तृषार्ताला पाणी द्यावे
तृप्ती लाभेल मनास खरी
स्वार्थासाठी जगणे नाही
हे खरे जगणे
यावे इतरांच्या कामी
पुण्य लाभेल परोपरी
ठेवावा हाच आदर्श
पाडावा हाच पायंडा
मग जीवनात येईल
अतीव रंगत न्यारी
डाॅ. नझीर शेख राहाता
जि.अहिल्यानगर
0
4
8
2
9
0



