
0
6
8
5
2
7
पाटीवर खडू
पाटीवर खडू चाले झुरू झुरू
अक्षर गिरविले आम्ही हळू हळू
पाटीवर अक्षर घेई आकार
पाटीवर खडू झाला साकार
काळी असे पाटी
मन तिचे निर्मळ
पाटीवर खडू घेई लिहून
अक्षर रूपी उमलले कमळ
पाटी अन खडू सदा सोबत
मैत्री त्यांची असे खास
मला त्यांचा सदा अभिमान
ह्रदयी फुले माझ्या स्वाभिमान
पाटीवर खडूने गिरविले धडे
अक्षर शब्दांचे फुलले मळे
वाक्यही झाले त्यावर साकार
ज्ञानाचा केला आम्ही स्विकार
पाटी खडूने आम्हा घडविले
संस्कार आम्हावर करविले
अज्ञान आमचे पळविले
ज्ञानाने आम्हा हसविले
या नवीन युगात
पाटी खडू हरविली
डिजिटल शिक्षणाने
जागा त्याची घेतली
रम्य ते बालपण
सुंदर असे ते दिन
शाळा ती सुंदर
पाटीवर खडूचं लेखन
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
6
8
5
2
7



