राष्ट्रपुरुषांच्या चरित्राची पुस्तकहंडी’
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
राष्ट्रपुरुषांच्या चरित्राची पुस्तकहंडी’
कृष्णाष्टमीला अत्रे शाळेचा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे – 29ऑ(प्रतिनिधी) कृष्णाष्टमी व दहीहंडीचा गोपाळकाला याचे औचित्य साधून दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांची पुस्तकहंडी’ साजरी केली.
प्रशालेच्या ग्रंथालयातील ‘बाल साहित्यकार इंदिरा अत्रे वाचनकक्षा’त झालेल्या या पुस्तहंडीमध्ये छ. शिवाजी व छ.संभाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पं. लालबहादूर शास्त्री, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर अशा राष्ट्रपुरुषांच्या चरित्रग्रंथांचा समावेश करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रनायकांच्या विचारांचे सादरीकरण करत देशाच्या उज्वल भविष्यासाठी ‘चांगले विचार, आचार व वाचन करण्याचा’ संकल्प जाहिर केला. सहभागी झालेल्या तीनशेहून अधिक मुलांना पुस्तक हंडीतील पुस्तके भेट देण्यात आली. अष्टविनायक संस्कार वर्गाच्या संचालिका श्रीमती निरुपमा दिवेकर यांनी ही पुस्तके भेट दिली.
ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ‘Indira Atre Reading Room’ या चॅनलवर अत्रे प्रशालेचे सर्व उपक्रम पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, अशी माहिती यावेळी भडसावळे यांनी सांगितली.





