Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामील करा – कॉ. राजेंद्र साठे

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

0 4 8 2 8 2

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामील करा – कॉ. राजेंद्र साठे

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज

नागपूर: (दि २४) आरोग्य विभाग कंत्राटी कर्मचारी युनियन (सी आय टी यु ) तर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाला घेऊन कंत्राटदारा मार्फत बाह्य कर्मचारी वितरण प्रणाली द्वारे अर्धवेळ सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) व जिल्हा आरोग्य अधिकारी(DHO) यांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन कॉ. राजेंद्र साठे यांचे उपस्थितीत सादर करण्यात आले.

कंत्राटदारा मार्फत अर्धवेळ काम करणाऱ्या 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करा तसेच इतर कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ शासकीय कंत्राटी पद्धती नुसार पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून नियुक्त करा, अर्धवेळ कंत्राटी कर्मचारी असल्या नंतर सुद्धा जास्त वेळ काम करण्याची ताकद देणाऱ्या मेडिकल ऑफिसर वर कारवाई करा, 5 महिन्यापासुन थकीत भविष्य निर्वाह निधी व मानधन त्वरीत जमा करा, कार्यमुक्त झाल्यानंतर पाच लाख ग्रॅज्युटी व दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा. या मागण्यांना घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन सादर करताना कॉ. राजेंद्र साठे, रमेश पानूरकर,अस्मिता सोमकुवर सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे