आरोग्य व शिक्षणई-पेपरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
गुढी उभारू एकात्मतेची
कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0
5
1
7
5
8
गुढी उभारू एकात्मतेची
चैत्र शुक्ल प्रतिपदेला
सण साडेतीन मुहूर्ताचा
भेदाभेद सारे विसरून
विचार करूया समतेचा
गुढी उभारू एकात्मतेची
भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची
पवित्र अस्मितेची, ममतेची,
चैतन्याची ,मांगल्येची
नवी दिशा नवीन आशा
गुढी उभारून समानतेची
चैत्र प्रतिपदेला सांस्कृतिक
विजयाच्या सामर्थ्याची
अंगणी रांगोळी काढून
पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून
गुढी उभारू एकात्मतेची
सुख ,समृद्धी नवा संकल्पन
एकात्मतेचे गुढी उभारू
जीर्ण विचारांचा त्याग करून
माणुसकीने माणसाशी वागून
नव्या विचारात प्रवाहात राहून
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
5
1
7
5
8



