बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील कविता
मुख्य आयोजक राहुल पाटील
*वैभवशाली*
नव्हेत केवळ पुराणकथा
रामायण,महाभारत,गिता
असे वैभवशाली परंपरेची
ही भारतीय आचारसंहिता.. //
जीवन विषयक तत्वज्ञान
अपार महती अद्यात्माची
यथायोग्य कारण मिमांसा
येथे बुद्धी प्रामाण्यवादाची.. //
संत, महंत, योगी, तपस्वी
पावन भूमी ऋषि मुनींची
दिक्षा, शिक्षा, ज्ञान भांडार
थोर परंपरा गुरू शिष्यांची.. //
होम,हवन,याग, मंत्रोच्चार
श्रद्धा, भक्ति,ऊर्जा,स्फूर्ती
नव्हे केवळ दुबळा दैववाद
कर्मवाद शिकवी संस्कृती.. //
हा गायत्री, महामंत्र, स्तोत्र
जागी करी कुंडलिनी शक्ती
ज्ञानाची सांगड विज्ञानाशी
दिव्यत्वाची येई महाप्रचिती.. //
विश्वकल्याणार्थ पसायदान
मागे माऊली विश्वात्म्याशी
याहूनही काय वैभवशाली
नाते आत्म्याचे परमात्म्याशी.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
भारत आमुचा वैभवशाली देश
सोन्याचा धूर निघत असे
एकमेकांचा द्वेष करु लागला
ग्रासला जात धर्म पंथाने
घरात समाज भिती साम्राज्य
मनी तेच खूळ बसे
तू आणि मी नसावा भेद
ईश्वर एक समर्पित व्हावे
मानवाला बुध्दीचे वरदान
सद्पयोगाने समाधान लाभे
परमार्थ सुरेख संसार सुरेल
जीवन हे सार्थक होते
आम्ही भारतीय भाग्यशाली
संस्कृती जपवणूक ठायीठायी दिसे
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
निसर्गाने बहरलेला
देश अमूचा महान
भिन्न बोली भाषा जरी
एकतेचे प्रतिक छान
भिन्न जाती धर्म भिन्न
भिन्न जरी भिन्न वेश
समता बंधुता येथेच दिसती
असा महान भारत देश
उत्तरेला हिमराज रक्षितो
दक्षिणेला सागर छान
पावन ही भूमी अमूची
गंगा यमुना याची शान
राम कृष्ण येथेच नांद्रे
इतिहास याचा गौरवशाली
विराजमान येथे विशाल पर्वत
देश अमूचा वैभवशाली
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
मराठी समृध्द
वैभवशाली भाषा
अलंकाराने सिध्द
सूर्योदयाची उषा ॥१॥
मधाळ लालित्य
अनुस्वाराचा टिळा
रसाळ साहित्य
उठून दिसे कपाळा ॥२॥
प्रश्नचिन्ह कुंडल थाट
सुरेख कर्णी छान
पूर्णविरामाचे गाली तिट
दिसते शोभून ॥३॥
उकारांचे पायी सुंदर
नृपुर गोलाकार
श्लोकांचा मुगुटमणी
विराजमान शिरावर ॥४॥
किमया होते
वैभवशाली शब्दांची
गेय गझल होते
अनेक अर्थाची ॥५॥
भक्त अभंग किर्तन
म्हणती ओव्या भारूडे
भाविक करीती भजन
शाहीर गाती पोवाडे ॥६॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*वैभवशाली*
वैभवशाली भारत माझा
धर्माधर्मात पाटलेला
प्रत्येकाचे झेंडे वेगळे
माणूस सोवळ्यात बाटलेला
व्यर्थ गेले बलिदान?
जे देशासाठी लढले
सुखावर ठेवून तुळशीपत्र
धारातीर्थी पडले
निघे सोन्याचा धूर
आता भ्रष्टाचाराचा पूर
विरोधक आणि सरकारही
सुरात मिळवितात सूर
अभेद्य कैक किल्ले
अजुनही साबुत आहे
पुतळा पडतो हवेने
किती हे दुर्भाग्य आहे
वैभवशाली आमची परंपरा
कोण काढतो मोडीत
शिव्यांची लाखोली वाहून
रात्रीला बोलती गोडीत
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
वैभवशाली परंपरा आहे
माझ्या महाराष्ट्र राज्याची
गड किल्ले साक्षी देतील
शूरवीरतेच्या पराक्रमाची
वैभवशाली परंपरा आहे
शिकवण ही साधुसंतांची
सत्य,अहिंसा,विश्वबंधुता
बीज रुजवी सदाचाराची
थोर समाज सुधारकाचा
अभिमान आहे कार्याचा
अंधश्रद्धा त्यागून तयांनी
स्वीकार विज्ञाननिष्ठतेचा
याच मातीत घाम गाळून
पिकवितो माणिक मोती
राबराब राबून बळीराजा
कसतो प्रामाणिक शेती
झाडे वेली पशु पक्ष्यांना
मिळतेय इथे अभय रान
दरिखोऱ्यात, रानावनात
बहरते सृष्टी नजारा छान
मिळे प्रेरणा,प्रेरक पाहून
वैभवशाली गौरव गाथा
जाण ठेवून त्या कार्याची
नमतो तया चरणी माथा
*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
जपलेली नाती,जपलेली प्रिती,
सांभाळता नाते,वैभवात न्हाती,…
पेटवूया चला, प्रेमाच्या प्रज्योती,
होईल देश हा, हा वैभवशाली?…१
नाही कुणी कमी, नाही कुणी धनी,
असेल सारेच,सारे सारे ऋणी…
जगतांनी जगा,सदा वैभवात,
नसावे दुःखात, जगामध्ये कुणी…२
स्वार्थी लोक येथे, स्वार्थ बघतात,
दुजा दुःख देण्या,संधी शोधतात…
दुजाच्या दुःखात,मानी समाधान,
ऐसे लोक स्व:ची,कब्र खोदतात…३
नाही यांना चिंता, नाही मुळी पर्वा,
लुबाडाया चाले,चाले धूर्तपणा…
नसे हे कुणाचे,सगे सोयरे हो,
स्वार्थासाठी उड्या,मारे टणाटणा…४
सांभाळ मानवा, नित्य सदगुणा,
येणे नसे कधी, जन्म पुन्हा पुन्हा…
*सुधाकरा* सांगे, ऐका तुम्ही जण,
न घडो या देही, चुकूनही गुन्हा…५
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
भारतीय संस्कृतीची
परंपरा वैभवशाली
ललामभूत जगताला
महती हिची गौरवशाली
संत साहित्याचा ठेवा
शूरवीरांचा इथे वारसा
भारतीय संस्कृतीने
दिधला समानतेचा वसा
विविधतेतही एकता
ब्रीदची या संस्कृतीचे
संस्कारची इथे होती
सदा नीति मूल्यांचे
अनेक धर्म नांदती
इथे एका छत्राखाली
नानाविध कलांसह
विज्ञानात झेप घेतली
उत्सव परंपरा सण
अनेकविध असती
शांततेने, उत्साहाने
साजरे केले जाती
अमूल्य असे साहित्य
मानदंडची ठरले
भारतीय योग शिक्षण
जगताला वंद्य झाले
भूतदया, प्रेम, शुचिता
शिकवते ही संस्कृती
त्याग, सत्य, प्रेमची
जोडे विश्वाशी नाती
त्रिखंडात डंका वाजे
भारतीय संस्कृतीचा
आदर्श असा संदेश
देतसे विश्वबंधुत्वाचा
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️