Breaking
ई-पेपरकोकणदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

अरेच्चा…. हे काय..? ‘फडणविसांनी केली शिंदेच्या माणसांची उचलबांगडी

फडणविसांनी शपथ घेताच शिंदेच्या दाढीवर वस्तरा

0 4 0 9 0 1

अरेच्चा…. हे काय..? ‘फडणविसांनी केली शिंदेच्या माणसांची उचलबांगडी

१४/१२ ला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त

फडणविसांनी शपथ घेताच शिंदेच्या दाढीवर वस्तरा

विशेष प्रतिनिधी, मुंबई

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

मुंबई: (वि.प्र.): राज्य सरकारचा कसबसा उशिरा का होईना शपथविधी समारंभ पार पडला. धाकधूक अजूनही मनात सरकार पडण्याची आहे. कारण, बैलेट पेपरवर निवडणूक पुनश्च होईल का? ही भीती असून ‘चोराच्या मनात चांदणं’ असल्यागत याची टोपी त्याला घालण्याचा घाट घातला जात आहे. नुकताच शपथविधी आटोपला पण, मुख्यमंत्र्याची धुरा खांद्यावर घेताच फडणविसांनी शिंदेच्या दाढीवर वस्तरा फिरवल्याची राजकीय गोटात चर्चा सुरु असून, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘माणसांची’ उचलबांगडी होणार असल्याची सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख असलेल्या मंगेश चिवटे यांना हटवून त्यांच्या जागी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून डॉ. रामेश्वर नाईकच काम सांभाळत होते. त्यांना पुन्हा या जागी आणण्यात आले आहे.

कोण आहेत मंगेश चिवटे ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वाधिक वैद्यकीय मदत करण्यात आलेली होती. या योजनेची त्यावेळी खूपच प्रसिद्धी झाली होती. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख असताना कोरोना काळात अनेकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात मंगेश चिवटे प्रसिद्धीला आले होते. त्यांना मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईच मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आला तेव्हा यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंगेश चिवटे यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केली होती.

कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक ?

डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. 2014 साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार होते. नंतर त्यांनी धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम केले. ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना डॉ. रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. डॉं. रामेश्वर नाईक गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात.

राज्य मंत्रीमंडळाचा १४ तारखेला विस्तार

महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यानंतर प्रचंड बहुमत मिळूनही तब्बल १२ दिवसांनी महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. आता कॅबिनेटचा विस्तार होणार आहे. मोठ्या चर्चा आणि वाटाघाटीतून अखेर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मंत्र्‍यांच्या खाते वाटपावर लगबग सहमती झाली आहे. १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत २८८ जागांवर मतदान झाले. आणि भाजपाने १३२, शिवसेनेने ५७ आणि एनसीपीने ४१, जेएसएसने २ आणि आरएसजेपीने १ जागेवर विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला असून त्यांना पन्नासी देखील ओलांडता आलेली नाही. विस्तारानंतर मुख्यमंत्री फडणवीस नागपूरच्या अधिवेशनासाठी आगेकूच करणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे