Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

कास्ट्राईब संघटनेतर्फे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0 3 2 5 6 4

कास्ट्राईब संघटनेतर्फे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

वर्धा: (दि १३) कास्ट्राईब कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीने मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि १३) धरणे आंदोलन करून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

या मागण्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नती मधील आरक्षण पूर्ववत लागू करावे. इतर राज्याप्रणाने सरसकट जुनी पेंशन योजना लागू करणे, शिक्षक कर्मचाऱ्यांना 10-20-30 ची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, सरकारी नोकरीतील कंत्राटी भरती रद्द करणे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पद भरतीतील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा. जिल्हापरिषद शिक्षकांना घरभाडे भत्ता मिळण्यासाठी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी.

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदोन्नती करण्यात यावी आदींसह विविध मागण्यांसाठी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महासंघाचे आम्रपाल कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार, जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील, प्रवीण लोहे, संजय गावंडे,अनिल वानखेडे, राजेश नंदागवळी, सुनील पाटील राकेश कुसनाके, नितेश काळपांडे, धम्मपाल आगलावे, संदीप कांबळे, आशिष तामगाडगे, कुणाल सहारे, संदीप थुल, निखिल वाघमारे, प्रमोद घरडे, सुधीर मुरार, सिद्धार्थ भगत, पंकज इंगळे संदीप कांबळे,विठलं सुटे,दिगाम्बर चव्हाण,चन्द्रभान पाटील,युवराज ढोके, पियुष जगताप जयश्री कांबळे,प्रीती सहारे, अशोक सुखदेवें,आदीसह बहुसंख्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 5 6 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
03:47