Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

महिलादिन

सविता धमगाये नागपूर

0 5 1 6 5 2

महिलादिन

ती राबत होती उन्हात
घामाने भिजलेली
जीवघेण्या उन्हात थिजलेली
मी विचारलं बाई ग
बस कि जरा आडोशाला
घे घोटभर पाणी
ती उत्तरली.. वेळ कुठाय
घरी तान्हुलं वाट पाहतंय

टाईप होणाऱ्या पेपरवर
नजर ठेवून चालत होती बोटे
एक लय घेऊन
विचारात कुठेतरी हरवलेली
वाटली नजर दूर स्थिरावलेली
राहवलं नाही मलाच
थांब ग बाई जरा तरी
ती हसली उगाच
बस मॅडम एवढंच उरलय तरी
मुलांचा अभ्यास राहीलाय घरी

ती दर्जेदार सुटात
वावरत होती टेचात
जग जिंकल्याचा आनंद
पाडत होता मलाच पेचात
ती सभा गाजवत होती
नवीन प्रोजेक्ट लिलया पेलत होती
पण तरीही का कुणास ठाऊक
मला आतून कोलमडलेली वाटत होती

महीला गृहीणी असो की कामकाजी
डॉक्टर इंजिनियर वकील न्यायाधीश
प्रपंचाची भाग सुटत नाही कधीच
मूले सांभाळायची तिने
वळण लावायचं तीनेच
कळतंय तिला
चुकलं जरा काही कधी
तर उद्धार तिचाच होणार
आईबाटाचे सासरचे नाव जपण्याचा
ठेका तीच उचलणार
महीलादिनाला एक दिवस
नाच नाच नाचणार
पुन्हा उद्या फिरून
त्याच चक्कीत जाणार

सविता धमगाये
नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे