‘मधुश्री प्रकाशना’चे काव्य पुरस्कार जाहीर; काव्यस्पर्धेला भरघोस प्रतिसाद
अमृता खाकुर्डीकर पुणे शहर प्रतीनिधी

‘मधुश्री प्रकाशना’चे काव्य पुरस्कार जाहीर; काव्यस्पर्धेला भरघोस प्रतिसाद
पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थित साजरा
अमृता खाकुर्डीकर
पुणे शहर प्रतीनिध
बिनधास्त न्यूज मिडीया
पुणे (दि ३ मे) येथील मधुश्री प्रकाशन संस्थेच्या वतीने कवी आणि कविता यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यानिमित एक विशेष काव्य स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला. ६०० कवी-कवीयित्रीं स्पर्धेत सहभाग झाले. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर होऊन विजेत्या स्पर्धकांना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक श्री. राजन लाखे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमित करकरे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मधुश्री प्रकाशनचे संचालक श्री. पराग लोणकर तसेच काव्य स्पर्धेच्या परीक्षक ज्येष्ठ कवयित्री कविता मेहेंदळे आणि मेधा लोणकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमात एकूण १५ पुरस्कार देण्यात आले. प्रथम, द्वितीय, तृतीय , उत्तेजनार्थ २ , उल्लेखनीय कवितांसाठी १० असे एकूण १५ पुरस्कार देण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमात श्री. पराग लोणकर यांनी प्रास्ताविक मांडले. मेधा लोणकर यांनी काव्यस्पर्धा उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. परीक्षक कविता मेहेंदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धेसाठी प्राप्त कवितांची विविधता, दर्जा आणि ६०० कवितांमधून १५ कवितांची अंतिम निवड करताचे आव्हान याचा आढावा घेतला. “काव्य म्हणजे तरल शब्दशिल्प” असे सांगून ही तरलता कवीने कशी जपावी याबाबत मार्गदर्शनही केले.
प्रमुख पाहुणे डॉ. अमित करकरे यांनी ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या सहवासातल्या काही सुंदर आठवणी जागवल्या आणि स्पर्धक कवींना कवितेमधून व्यक्त होणे, यामागे कसे मानसिक स्वास्थ्यही दडलेले असते, हे उलगडून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजन लाखे यांनी “साहित्यातील मुकुटमणी म्हणजेच कविता” असा कवितेचा गौरव करून मधुश्री प्रकाशनाच्या काव्य स्पर्धा उपक्रमाची प्रशंसा केली. पुरस्कार प्राप्त कवींचे कौतुक करून मधुश्री प्रकाशनाचे अभिनंदन केले.
पुरस्कार विजेत्या कवींनी.मधुश्री प्रकाशनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व पुरस्काराबद्दल भावपूर्ण शब्दात आपले मनोगत मांडले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष प्रकाशक श्री. राजीव बर्वे तसेच ज्येष्ठ कवयित्री डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.
सूत्रसंचालन लेखक श्री. किरण आचार्य यांनी व संयोजन वीणा पेशवे यांनी केले.
*पुरस्कार विजेत्या कविता व कवी*
प्रथम पुरस्कार – कविता- ‘महाभारत’
कवी: श्री. मकरंद घाणेकर
द्वितीय पुरस्कार – कविता- ‘जय महाराष्ट्र बोला!’
कवी श्री. सचिन बेंडभर
तृतीय पुरस्कार – कविता ”झाड’ –
कवी श्री. अशोक भांबुरे.
याशिवाय उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त व उल्लेखनीय कवी; जया गाडगे, काजल शिंदे, हर्षवर्धन सोनवणे, मुक्तेश्वर मुळे, डॉ. छाया निटूरे-भिसे, सुनील भातंब्रेकर,रामेश्वर तोंडे , डॉ. प्रविण मोरे ललित बोरकर , प्राजक्ता जाधव,अंजली महाजन , डॉ. स्मिता सहस्रबुद्धे ईत्यादीनी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.



