दूषित पाण्यामुळे गावांवर आरोग्याचा धोका; ग्रामसेवक मुख्यालयात गैरहजर
गजानन ढाकुलकर हिंगणा शहर प्रतिनिधी

दूषित पाण्यामुळे गावांवर आरोग्याचा धोका; ग्रामसेवक मुख्यालयात गैरहजर
प्रशासन बेफिकीर? समस्या कुठे मांडणार? नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
गजानन ढाकुलकर
हिंगणा शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/हिंगणा : (दि २४) हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मांडव, घोराड आणि सालईमेंढा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका विहिरीतील पाणी टाकीत भरून नागरिकांना पुरवठा केला जात आहे. मात्र संबंधित विहीर आणि पाण्याची टाकी दीर्घकाळापासून स्वच्छ करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्यात कीडे आढळत असूनही तेच पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे गावांमध्ये आजार पसरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राहुल चौके यांनी आरोप केला आहे की ग्रामसेवक मुख्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना आपली समस्या मांडणे कठीण होत आहे. त्यांनी तात्काळ विहीर व पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का? नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळणार का? याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



