Breaking
ई-पेपरकवितानांदेडसाहित्यगंध

गुरुपौर्णिमा

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जि.नांदेड

0 4 8 2 8 4

गुरुपौर्णिमा

मिळे आकार जीवना
ज्यांच्या थोर शिक्षणाने
नतमस्तक मी तयापुढे
घडवले ज्या गुरुजनाने

अंधारल्या वाटेवरती
दावी प्रकाश ज्ञानाचा
त्यांच्याप्रती ही कृतज्ञता
सण आला गुरुपौर्णिमेचा

माय-बाप बहिण-भाऊ
सखा होती प्रसंगानुरूप
किती वर्णावी महती
येतो तनामनाला हुरुप

गुरु-मास्तर-शिक्षक
अशी नानाविध नावे
आपुल्या या जीवनात
त्यांची स्मृती उरी ठेवावे

आदर्श शिकवणुकीमुळे
आम्ही घडलो तुम्हीबी घडा
घालून गवसणी आकाशाला
ठेवा सदा स्मरणात धडा

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि.नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे