ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरनांदेडपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
स्वराज्यरक्षक
बळवंत शेषेराव डावकरे
0
4
8
2
9
3
स्वराज्यरक्षक
शिवबाराजेंचे वीर छावे तुम्ही
स्वराज्यरक्षक संभाजी राजा
अजिंक्यवीर योद्धे या भुमीचे
मानाचा घ्या राजं मुजरा माझा
मातृप्रेम न लाभले छाव्याला
वाढला माजिजाऊंच्या कुशीत
समरधुरंधर चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व
घडला जिजाऊ शिवबांच्या मुशीत
झुंजविला औरंगजेब वर्षानुवर्षे
युक्तीशक्तीच्या शौर्यबळावर
उधळला मनसुबा तख्त घेण्याचा
जिगरबाज मावळ्यांच्या मर्दुमकीवर
स्वराज्यरक्षक राजे संभाजी
बदनाम केले सनातन्यांनी
झाकता न येतो सूर्य नभीचा
अजरामर त्यांची शूर कहाणी
शौर्य पाहुनी राजं तुमचे
अभिमानाने फुलते छाती
बलिदानाने पावन झाली
स्वराज्याची पवित्र माती
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि.नांदेड
======
0
4
8
2
9
3



