0
4
0
9
0
3
आयुष्य
आयुष्याच्या पानावर …
चार शब्द प्रेमाचे
लिहावे जपूनी …..
पुर्ण विश्वासाने ।।
जीवन हे.. आज ना उद्या…
कधी तरी संपायचे…..!
मग हे भौतिक सारे…
इथेच इथे रहायचे….।।
कुणाचे बोचनारे शब्द….
दुखावणारे कृत्य….
मानत ठेवायचे…..?
नको….नको…. ..ते सारे….
क्षणात विसरून इथे…जायचे
आत्मा हा पाहूणा आहे….
चार दिवस रहायचा….
घरची ओढ लागली की
क्षणात निघून जायचा….!
कधी वाटे थोडे……
कधी रस्ता ना…सरे…
आयुष्य जणू अवघे….
जादूचे पसारे….आयुष्य
जणू अवघे…. जादूचे पसारे ।।
कंचना मंडपे नागपूर
========
0
4
0
9
0
3





