जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे ‘दप्तराविना शाळा’
'शनिवार माझ्या आवडीचा' उपक्रमाचे आयोजन
जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे ‘दप्तराविना शाळा’
‘शनिवार माझ्या आवडीचा’ उपक्रमाचे आयोजन
पवनी: जि.प. उच्च प्रा शा भोजापूर ता.पवनी जि. भंडारा येथे आज दिनांक १३/०७/२०२४ रोजी ‘दप्तराविना शाळा’ शनिवार माझ्या आवडीचा या उपक्रमांतर्गत वर्ग १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यासांठी ‘चित्रकला स्पर्धा’, मैदानी खेळ, कवायत व ‘एक तास वाचनाचा’ असे सर्व सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व उपक्रमात सर्व विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. चित्रकला स्पर्धेत वर्गानिहाय विषय देण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार सुंदर व आकर्षक चित्रे काढून रंग भरले. ‘एक तास वाचनाचा’ या उपक्रमात सर्व विद्यार्थांना भाषिक व क्रमिक तसेच गोष्टीचे पुस्तके देण्यात आले. पुस्तक वाचनानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे पुस्तक वाचनाबाबत अभिप्राय व मनोगत घेण्यात आले. विद्यार्थांनी आनंदाने वाचन केल्याने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या सर्व उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी आनंदात होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक प्रवीण पडवाल, पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख,साधनव्यक्ती राकेश पारधी व सहशिक्षक पाटील आर जी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व शिक्षक वृंदानी या सर्व उपक्रमात सहकार्य केले.