वीज कंत्राटी कामगारांचे ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
वीज कंत्राटी कामगारांचे ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.दि.1ऑ. (प्रतिनिधी) भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या “महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने” ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा. ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असून दि. 12 ते 17 ऑगस्ट या कालावधीत साखळी उपोषणाद्वारे हे आंदोलन केले जाणार आहे.
त्यानंतर दि. 20 ऑगस्टला सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या दारात लाक्षणिक आंदोलन होईल आणि 24 ऑगस्टला रेशीमबाग मैदानापासून उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपुरच्या घरापर्यंत मोर्चा काढून तिथे बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी माध्यमांना सांगितले आहे.
वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबण्यासाठी “नॉमिनल मस्टर रोल” किंवा हरियाना सरकारच्या धर्तीवर कंत्राटदाराला 60 वर्षा वयापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा, तसेच मागणी पत्रकाप्रमाणे वेतनात वाढ मिळावी, या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, याबाबत मा.उर्जा मंत्री यांनी मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आश्वासन दिले होते, पण त्याप्रमाणे अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.
म्हणून आता आमरण उपोषणाचा मार्ग अनुसरावा लागला, असे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले. यास राज्यातील सर्व कामगार संघटनांनी या आंदोलनास निर्णायक पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी केले आहे. या आंदोलनाबाबत वीज कंत्राटी संघटनेने सरकाराला व प्रशासनाला रीतसर लेखी नोटीसही दिलेली आहे.