बाजारीकरणाचा वारू उधळी जीवनाची रम्यता…..!; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
बाजारीकरणाचा वारू उधळी जीवनाची रम्यता…..!; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
अगं अगं थांब…कुठे पळतेस….? आज्जी मला पकडून दाखव बरं….अस्सं का लबाडे….सापडली सापडली….सापडली गं आमची चिमू…आजी आता मी हलली, तू जिंकलीस…काय बक्षीस देऊ तुला…अगं काही नको फक्त तुझी एक गोड पप्पी…अले वा, कित्ती छान…!
आजी आणि नातीच्या नात्यातील किती गोड बरे हा व्यवहार…या व्यवहाराला देखील आता ग्रहण लागलंय…पैसा, वस्तू, चमचमत्या गिफ्ट्सची रेलचेल यांनी बालपणातच नात्यांचे बाजारीकरण सुरू झाले. जिथे श्रद्धास्थाने पंचतारांकित होऊन भक्तीभावाचा लय होऊ लागला तिथेच….
भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी……
असे म्हणायलाही मन धजत नाही. ‘बाजारीकरण’, आजच्या युगात प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण झाले असे आपण म्हणतो. खरेतर बाजार म्हणजे काय तर विक्रेता आणि ग्राहक यांतील व्यवहार. हा व्यवहार कुठवर असावा तर वस्तूंपर्यंत पण आज आपण बघतो की, प्रत्येक क्षेत्रामध्ये बाजारीकरणाने शिरकाव केलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक राजकीय, वैद्यकीय असे कुठल्याही क्षेत्राचे त्याला नाविन्य राहिलेले नाही. भरमसाठ शुल्क घेऊन चालणाऱ्या शैक्षणिक संस्था, समाजातील बाजारीकरणामुळे हरवलेली नाती, सत्तेसाठी चालणारा घोडेबाजार आणि उंच उंच इमारती उभारुन थाटलली इस्पितळे या सर्व ठिकाणी सेवाभाव लोप पावून बाजारीपणा आलेला दिसतो.
तरीसुद्धा या सर्व नकारात्मक बाबींना दूर सारून काही महनीय व्यक्ती सेवाभावी वृत्ती जोपासून स्वयंप्रकाशीत ताऱ्यांप्रमाणे समाजपटलावर चमचमत असतात…. त्यांना शतशः प्रणाम….!
आज मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य प्रशासक माननीय राहुलदादा पाटील यांनी ‘बाजारीकरण’, हा विषय दिला. अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास उद्योगधंद्यांतील घडामोडींचा आढावा घेणारा हा शब्द मात्र आजच्या युगात एक शापित शब्द बनून वापरला जातो…याचे वाईट वाटते कारण ज्या-त्या गोष्टींत, नात्यांत होणारा नफा तोट्याचा विचार….पण चला एका ‘बाजारीकरण’, या शब्दाने मराठीचे शिलेदारांच्या मनाचा तळ ढवळण्याची किमया केली. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि मुख्य प्रशासकांचे मनःपूर्वक आभार…..!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह