सरमिसळ मराठी उर्दू शब्दांची, बांधणी भाषा वैभवाची…!; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

सरमिसळ मराठी उर्दू शब्दांची, बांधणी भाषा वैभवाची…!; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
मराठी, मायमराठी म्हटले की, आपला ऊर भरून येतो… हलकेच गुणगुणायला लागतो. ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’. नुकताच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी हा सोहळा जिथे जिथे मराठी बांधव आहेत तिथे तिथे साजरा करण्यात आला. कथा, कविता, गाणी, नाटक, कादंबरी अशा विविध रूपांतून ही मराठी आपल्या समोर थिरकत येते. पण याच मराठी भाषेवर या महाराष्ट्रात राज्य करुन गेलेल्या विविध सत्तांचा सुद्धा परीणाम झालेला आहे. उर्दू, फारसी त्याचबरोबर इंग्रजी यांसारख्या भाषांतील शब्द मराठीच्या बोलीभाषेत इतके बेमालूमपणे सरमिसळ झालेले आहेत की, ते परकीय वाटतच नाही. यांसारखाच शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेसाठी माननीय राहुल पाटील यांनी दिलेला ‘कैफियत’, हा उर्दू शब्द.
कैफियत म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ती तक्रार. जशी समूहातील रचनांमध्ये वर्णिली आहे. मुके प्राणी, वृक्ष, वृद्ध, पुस्तके, अनाथ लेक, नव्या युगातील नारी, बळीराजा यांसारख्या अनेकांची कैफियत शिलेदारांनी आपल्या रचनांमधून अधोरेखित केली आहे. त्यांतील प्रवीण हरकारेंची कैफियत मात्र गालातल्या गालात हसवून गेली….
कैफियत माझी सखे
ऐकून घेशील का जरा
उठसूठ खरेदीला जाण्याची
सवय सोड ना गं सुंदरा…
किती गोड कैफियत ना दादांची….!
कैफियत या शब्दाचा एक अर्थ अहवाल असाही आहे. १८ व्या, १९ व्या शतकात दख्खनच्या पठारावरील गावखेड्यांचा अहवाल तेथील ग्रामलेखाकारांनी लिहून ठेवलेला आहे त्यालासुद्धा कैफियत म्हटले जाते.
कैफियत शब्दाविषयी आणखीन एक गौरवशाली गोष्ट म्हणजे प्रसिद्ध ‘कैफियत एक्स्प्रेस’, ही भारतीय रेल्वेची सुपरफास्ट ट्रेन. जिचे नाव प्रसिद्ध उर्दू शायर कैफी आझमी यांच्या नावावरून देण्यात आले आहे आणि आजमगढ ते दिल्ली असा तिचा मार्ग आहे.
तर अशा अनेक भाषांतील शब्दांनी मराठी भाषेच्या शब्दांमध्ये सुंदर सरमिसळ केलेली आहे. ज्यामुळे मराठी भाषा बंदिस्त न राहता प्रवाही राहिली… आणि आपले अस्तित्व टिकवून आज अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देशातच नव्हे तर जगात गौरवशाली झाली. तसे तर भाषा कुठलीही असो, भावना व्यक्त करणे जिच्यातून सहजसोपे ती सहज स्वीकारली जाते….याच प्रेरणेतून कैफियत मांडणारी माझी स्वरचित रचना आपल्या रसग्रहणासाठी….!
हवा तो उतनी सर्द नहीं हैं,
फिर भी क्यूं कॉंप रही हूं मैं ?
धूप तो इतनी तेज नहीं है,
फिर भी क्यूं जल रही हूं मैं ?
बारिश तो इतनी घनी नहीं,
फिर भी क्यूं पलके भिगो रहीं हूं मैं ?
पता नहीं आजकल…..
कैसा मौसम चल रहा हैं ?
बेवजह खामोशियों में घूल रहीं हूं मैं ।
ऐ जिंदगी…
तुझे जिंदादिल कैसे बनाएं ?
पुतले के जैसे इन्सान देखकर,
अपने आप में सिमट रही हूं मैं ।
क्यों अपनी दिल की कैफियत….
ज़माने से उजागर कर रही हूं मैं ।
आज दि. २ मार्च २०२५ ला नागपूर नगरीत साजरा होत असलेल्या ‘कवितेवर बोलू काही ‘ या कार्यक्रमास लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह