रायगड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक निकालाची प्रतिक्षा
लेखक - बळवंत वालेकर

रायगड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक निकालाची प्रतिक्षा
लेखक – बळवंत वालेकर
अलिबाग (- दि. १ ) रायगड जिल्ह्यात १० नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचार शिगेला पोचला आहे . हा प्रचार अधिक्रुतपणे दि. एक डिसेंबर रोजी रात्रौ १० वाजेपर्यंत करता येईल . महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना अपेक्षित असताना महायुतीतील घटक पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे गट) विरुद्ध भा. ज. पा.. काही ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध महायुतीतील अन्य घटक पक्ष असा सामना अनेक ठिकाणी होत आहे , परंतु महायुती विरूध्द महाविकास आघाडी आसा दुरंगी सामना अपेक्षित आहे . पण महायुतीतील वादंग टोकाला गेले आहेत . म्हणून राज्यात *महायुती* टिकेल का , हा यक्षप्रश्न आहे . आसो.
पनवेल येथे महानगर पालिका आहे . महाराष्ट्रात महानगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पनवेल महापालिकेची निवडणूक होईल .
*नगरपालिकाःचा इतिहास*
रायगड जिल्ह्यात *पनवेल* येथे पहिली नगरपालिका १८५२ साली स्थापन झाली , या नगरपालिकेचा कारभार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चालू झाला. ब्रिटिश शासनाने जमीनदार, व्यापारी व उच्च शिक्षितांना अंशतः मताधिकार दिल्यामुळे १८८२ साली ५ पदसिद् व ११ नियुक्त सदस्य नैमले गेले. लोकनियुक्त सदस्य निवडल्यानंतर नगराध्यक्ष निवडण्यास सुरुवात झाली.
मुंबई शहर जवळ असल्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली व २०१५ पासून या पालिकेचे *महानगरपालिके* रूपांतर झाले.
*अलिबाग पालिका* – अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे येथे नगरपरिषद असणे गरजेचे होते . येथे १८६४ साली पालिका सुरू झाली. काही वर्षे जिल्हाधिकारी पदसिद्ध नगराध्यक्ष होते . १९११ साली पहिली निवडणूक होऊन नगरसेवक निवडले गेले. जमीनदार , व्यापारी व
उच्चशिक्षितांना मताधिकार होता . अशाप्रकारे *जमशेटजी वामनजी* या धनिकास प्रथम नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला . प्रशासकीय कारभारानंतर आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे . कोणा भाग्यवान महिलेस नगराध्यक्षपदाची लाॕटरी फुटते , याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
*पेण* – या शहरासाठी १८६५ साली नगरपालिका चालू झाली . काही वर्षे जिल्हाधिकारी हे च पदसिद्ध अध्यक्ष होते . जमीनदार , व्यापारी तसेच उच्चविद्याविभूषित नागरिकांना मताधिकार मिळाल्यानंतर पालिकेची निवडणूक होऊन लोकनियुक्त कौंसिल बनले व त्या “उच्चभ्रू ” सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडले गेले येथे धारकर कुटुंबियांना अध्यक्षपदाची संधी अनेकवेळा मिळाली . नवीन नियमावलीनुसार चालू असलेली निवडणूकही अटीतटीची झाली .
*महाड* – महाड हे प्राचीन शहर आहे , येथील बाजारपेठ कोकणात प्रसिध्द आहे . महाडची व्युत्पत्ती
“महा- हाट. (हाट म्हणजे बाजारपेठ .) मोठी बाजारपेठ . त्याचे रुपांतर *महाड* असे झाले . या शहराला *चवदार तळ्यामुळे विशेष प्रसिद्धी मिळाली . या तलावाचे पाणी “हरिजनांना”
( विद्मान नवबौद्ध) हक्काने मिळण्यासाठी डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी सत्याग्रह केला. त्याची नोंद मुंबई हायकोर्टाने घेतली व १७ मार्च १९३७ रोजी *सदर तलाव सार्वजनिक* असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर महाड पालिकेने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी ७० लाख रुपये खर्च केले. दलितांच्या श्रुंखला तुटल्या हीच समाजात *समानता* सुरू । झाल्याची नांदी आहे .म्हणून २० मार्च हा दिन महाड येथे शासकीय पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा होतो .
सदर पालिका १८६६ मध्ये सुरू झाली . येथे काही वर्षे जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष होते . शहरातील “उच्चभ्रू” नागरिकांना मताधिकार मिळाल्यानंतर लोकनियुक्त कौंसिल बनले व त्यातून नगराध्यक्ष निवडले जाऊ लागले , येथेही पालिका निवडणूक अटीतटीची असून निकालाकडे सर्वांचे लक्ष वैधले आहे .
*रोहे* – या शह राची नगरपालिका
१८६६ साली चालू झाली.काही वर्षे जिल्हाधिकारी हेच पदसिद्ध अध्यक्ष होते . अष्टमी हे गाव रोह्यास लागून . ( कुंडलिका नदीपलिकडे)
) आहे . म्हणून या पालिकेचे नामकरण रोहे -अष्टमी नगरपालिका आसे झाले . भारताचे पहिले अर्थमंत्री विद्वद्रत्न डाॕ, सी. डी. देशमुख यांचे बंधू वाय्,. डी. देशमुख अनेक वर्षे या पालिकेचे नगराध्यक्ष होते . धाटाव परिसरात औद्योगिकरण वाढल्यामुळे
या शहराला उभारी मिळाली . नगरपरिषदेच्या निवडणुकीत
“नगराध्यक्ष कौन बनेगा ?” याबाबत नागरिकांची उत्क़ंठा शिगेला पोचली आहे .
*उरण पालिका* – ही नगरपालिका
१८६७ साली सुरू झाली . उरण , करंजा व मोरा या ३ गावांचा समावेश या पालिकेत होता परंतु काही तांत्रिक बाबीमुळे करंजा महसूल विभाग या पालिकेतून वगळण्यात आला. १९४३ पर्यंत नगरपालिकेत १२ लोकनियुक्त व ३ शासननियुक्त सदस्य होते . पण देशात लोकशाही राज्य पद्धती चालू झाल्यापासून लोकनियुक्त सदस्य पद्धती चालू झाली . हे शहर मुंबई लगत आहे.आता तर रेल्वेने जोडले गेले आहे . J, N, P, T हे आंतरराष्ट्रीय बंदर शिवाय जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे या शहराचे महत्त्व फारच वाढत आहे . दळणवळणाचे जाळे व वाढते औद्योगिकरण म्हणून लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे . करिता लगतच्याकाळात “क” वर्गीय महापालिका बनण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पालिकेची निवडणूकही जोशात आहे . “कौन बनैगा नगराध्यक्ष” ही चर्चा जोरात आहे .
*मुरुड पालिका* – मुरुड , श्रीवर्धन व म्हसळा या ३ तालुक्यांनी *जंजिरा संस्थान* बनले होते . त्याचे मुख्यालय मुरुड होते . नबाब सर्व हधर्मप्रिय होते . म्हणून प्रजाही खूष होती . पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने विलिनीकरण मोहीम चालू झाली . त्यामुळे हे ‘ ञथञळसंस्थानही भारतात अर्थात पूर्वीच्या *कुलाबा जिल्ह्यात* विलीन झाले .
. मुरुड पालिका ही संस्थानातील एक पालिका. पालिका १८८८ साली स्थापन झाली . कालांतराने येथे , लोकनियुक्त प्रतिनिधी निवडले गेले .व नगराध्यक्षांच्या नेत्रुत्वाखाली कारभार चालू झाला.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येथेही निवडणुकीची धमाल सुरू आहे . कोणाची सत्ता येणार व थेट नगराध्यक्षपदाच्या लढाईत कोण जिंकणार याबाबत पैजा लागल्या आहेत .
*श्रीवर्धन पालिका* – ही पालिकादेखिल जंजिरा संस्थानच्या ताब्यात होती . . येथेही १८८८ साली पालिका चालू झाली. प्रथमतः संस्थानिकाच्या नियंत्रणाखाली कारभार चालू होता . भारतात लोकशाही राज्यपद्धती सुरू होताच निवडणूक पद्धतीने नगरसेवक व नगराध्यक्ष निवडू लागले . आता थेट नगराध्यक्ष पद्धतीत विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते , याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .
*माथेरान गिरीस्थान परिषद* -माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे सुप्रसिद्ध ठिकाण आहे . ठाणे जिल्हाधिकारी एच्. पी. मॕलेट १८५० साली पहिल्यांदा माथेरान येथील दुर्गम डोंगरात चढून गेले . तेथील निसर्ग सौंदर्य पाहून त्यांना या ठिकाणाची भुरळ पडली . त्यानंतर अनेक निसर्ग प्रेमी व पर्यटक माथेरानच्या निसर्ग सौँदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जाऊ लागले . नंतर पर्यटकांसाठी भौतिक सुविधा ब्रिटिश शासनाने निर्माण केल्या. काही भागापर्यंत रेल्वे सुविधाही आहे . म्हणून पर्यटक व निसर्ग प्रेमींचे लोढे माथेरानकडे वळत आहेत . येथील निसर्ग सौंदर्य अबाधित राहावे , प्रदूषण वाढू नये ः , पशू , पक्षी व वनस्पतींची जपणूक होण्यासाठी विविध उपाययोजना शासन करीत आहे . येथे लोकसंख्या कमी असल्यामुळे नगरपालिका स्धापन होत नव्हती . पण सुव्यवस्थानासाठी गिरीस्थान नगरपालिका ब्रिटिशांनी १९०५ साली चा लू केली . प्रारंभीच्या काळात जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष होते , नंतर उच्चभ्रुंना मताधिकार दिला गेला. लोकशाही राज्यपद्धती सुरू होताच आमजनतेचे प्रतिनिधी पालिकेचा कारभार हाकू लागले . येथेही निवडणुकीची धामधूम चालू आहे . नगराध्यक्ष कौन बनेगा , याबाबत औत्सुक्य वाढले आहे .
*खोपोली नगरपालिका* – खालापूर तालुक्यातील खोपोली हे छोटे खेडे होते . खोपोली – खोपीवली – खोप आवली. खोप म्हणजे केंबळीने शाकारलेली घरे.व त्याची आवली म्हणजे रांग अशी ती *खोपोली*. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर ते वसले आहे . बोरघाट हा पूर्वी अवघड घाट होता . खोपोली येथे वाहनाने विश्रांती घेतल्याशिवाय (इंजिन थंड झाल्याशिवाय ) घाट चढणे अशक्य होते . म्हणून हा थांबा महत्त्वाचा होता . तसेच मुंबई व पुणे ही दोन्ही शहरे समान अंतरावर आहेत .या कारणांनी खोपोलीचे महत्त्व वाढू लागले . अल्टा , मस्को ,
I, O. C. या कँपन्या आल्या. .हळूहळू लोकसंख्या वाढू लागली . शहरीकरण झाले . म्हणून ग्राम पंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर १९७० साली झाले . करावे लागले . राष्ट्रीय महामार्गावरील शहर , मुंबई व पुणे या शहरांशी जवळीकता , व रेल्वे स्टेशनची उपलब्धता यामुळे कारखानदारी बेसुमार वाढली. महाराष्ट्रातील बेकारांना काम -धंदा येथे मिळू लागला . जकात व घरपट्टीमार्फत मिळणारे नगरपालिकेचे उत्पन्न बेसुमार वाढले. बघता बघता खोपोली नगरपालिका महाराष्ट्रातील श्रीमंत नगरपालिका गणली गेली . स्वतःची परिवहन सेवा सुरू केली. विविध भाषिक प्राथमिक व माध्यमिक शाळा चालू केल्या. महाविद्यालय व तंत्र शाळाही सुरू केली. पण कालांतराने कारखाने बंद पडू लागले , नगरपालिकेत पाःढरे उंदीर घुसले म्हणून . हा हा म्हणता नगरपालिका कंगाल बनली. गतवैभव लुप्त झाले .
येथेही निवडणुकीची ढमाल सुरू आहे.वातावरण तापले आहे .प्रचार सभांचा लोकांना वीट आला आहे हौशे , नौशे , गौशे *बेधुंद* झाले आहेत . दोन डिसेंबरला मतदान व तीनला निकाल आहे . “कौन बनेगा नगराध्यक्ष, ” याबाबत अंदाज ,,प्रतिअंदाज , तसेच पैजा चालू आहेत .
*कर्जत नगरपालिका* – सह्याद्री च्या पायथ्याशी , उल्हास नदीच्या पश्चिम तीरी वसलेले कर्जत . मुंबई – पुणे रैल्वे मार्गावरील रेल्वे स्टेशनमुळे या शहराचे महत्त्व वाढले. रेल्वे स्टेशनमुळे तसेच लोकलच्या सुविधेमुळे मुंबई , ठाणे , कल्याण येथे नोकरी करणारे :- कमी खोलीभाडे म्हणून कुटुंबासह कर्जत येथे राहू लागले ..कमी दराने भूखःडमिळतो म्हणून सदनिका बांधल्या. परिणामी येथे लोकसंख्या वाढली . म्हणून येथील गौराम पंचायतीचे दि. १ / १० /१९९२ रोजी नगरपालिकेत रुपाःतर झाले . गुंडगे , भिसेगाव , मुद्रेबुद्रुक , मुद्रेखुर्द, दहिवली तर्फ नीड , शिरसे व आकुर्ले ही गावेही नगरपालिकेत समाविष्ट झाली . येथेही पालिका निवडणुकीची ढमाल सुरू आहे . अनेक पक्ष व आघाड्या तसेच ंअपक्ष उमेदवार सज्ज आहेत , उद्या मतदान व परवा निकाल जाहीर होईल. कोणाची *लाॕटरी* फुटते , याबाबत कमालीचे औत्सुक्य आहे .



