‘इतिहास विषय कंटाळवाणा’… छे..हो.. मुळीच नाही..!!!
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी, उमरेड रोड,नागपूर

‘इतिहास विषय कंटाळवाणा’… छे..हो.. मुळीच नाही..!!!
‘चला आज आपण मोहेंजोदडो आणि हडप्पा विषयी बघणार’, मुले आपल्या बॅगमधून इतिहासाची पुस्तके काढत होती. ही सूचना म्हणजे विद्यार्थ्यांला अतिशय कुठल्यातरी विश्वात गेल्यासारखे व्हायचे. कारण मी ऐकले होते की, इतिहास विषय म्हणजे बोंरिग..!! पण मी ती भावना विद्यार्थ्यांत रूजूच दिली नाही. त्यांना तेवढ्याच आवडीने त्यात ते रमायचे कधी कुठल्या राज्याची माहिती कधी तिथल्या राजाने केलेल्या सामाजिक सुधारणा, दोन राज्यातील शत्रुत्व आणि परस्परांवर केलेल्या स्वाऱ्या त्याच्यातील तुंबळ युद्ध असे काही ऐकताना विद्यार्थी देहभान हरपून जात. त्याचबरोबर मी शिकविताना विशेष असल्यास त्या ओळीना अधोरेखित करावयास सांगत असे. प्रत्येक कृतीच्या वेळी माझ्या आवाजाचे आरोह अवरोह बदलत असत. चेहर्यावरील भावही कमालीचे उत्स्फूर्त होत असत.
“इतिहास म्हणजे केवळ लढाया, जय पराजय, तह एवढेच नव्हे तर इतिहासाच्या पानात संस्कृती असते. रुढी-परंपरा असतात”. प्राचीन लोकजीवनाचे कितीतरी पैलू त्यातून उलगडतात. मी पाठ समजवून सांगताना संपूर्ण उकल व सविस्तर समजावून सांगत असे. आपण जे वर्गात शिकवितो ते दृकश्राव्य साधनातून शिकविले की, ते विद्यार्थ्याच्या स्मरणात राहतात. मध्येच थांबून विद्यार्थ्याचे चेहर्यावरील भाव न्याहाळण्याची लकब माझ्यात होती. मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन्ही ठिकाणी उत्खनन करताना त्या वेळच्या संस्कृतीचे अवशेष कसे मिळाले. ती संस्कृती कशी होती, तेव्हाचे लोकव्यवहार कसे होते हे विद्यार्थ्यांना निट समजावून सांगत असे.
माझ्या सातव्या वर्गातील मोहित व रमण अतिशय हुशार. ते इतिहास शिकविताना नीट लक्ष देवून ऐकायचे. त्यातील मोहित हा जिज्ञासू, एकदा शाळा सुटल्यावर पाचनंतर मुले घरी धावत जाण्यास निघाली, काही अंतर गेल्यावर मोहितला एक पिवळसर पडलेला चतकोर कागद दिसला तो उचलला तर मित्र हसतील म्हणून तो त्यांच्यासमोर उचलण्याचे धाडस करत नव्हता. अशाच एखाद्या वार्याने कागद उडून जाणार म्हणून मोहितनी तेथील छोटासा दगड पायानी त्या कागदावर ठेवला. आता तो कागद इकडे तिकडे जाण्याची शक्यता नव्हतीच. मित्रांबरोबर फिरून झाल्यानंतर संध्याकाळ भरून आली होती. काळोख अंधारला. निर्मनुष्य रस्त्यावर जायची भिती होती. मोहितनी झपाझप पावले उचलत टेकडीकडे निघाला. अंधारात तो कागद तसाच पडला होता. अंधार असल्यामुळे तो कागद वाचणे शक्य नव्हते घरी कंदील आईने लावलाच होता. त्या कागदावर एका चित्रकला स्पर्धेची जाहिरात होती. दोन दिवसांनी मुदत संपणार होती. आईला सांगून कोरा कागद मागविला घराजवळच्या झाडाचे फुलाचे आणि पलीकडे असलेल्या छोटया झोपडीवजा घराचे चित्र खिडकीत बसून काढले कधी त्या बाहेरील दृश्याला तर कधी कागदावरील चित्राकडे मोहित बघायचा नंतर त्याला साजेशे रंग दिले.
बरेच दिवस निघून गेले. शेजारील काकू आईकडे धावतच बाहेरून आवाज देत आल्या ” ऐकलं का तुमच्या मुलाचे नाव पेपरला छापून आलेले आहे. त्याने काढलेल्या चित्राला स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे.” मोहित पेपरमधील स्वतःचे छापील नाव प्रथमच पाहत होता यामुळे मोहित कमालीचा हरखून गेला. बक्षीस वितरण समारंभ पुण्यात होणार होता. तो दिवस उजाडला. आजोबांबरोबर तो पुण्यात आला. एक मोठे चित्रकार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते माझ्या चित्राबद्दल बरेच काही बोलले.
सौंदर्य, कल्पकता, रंगसंगती त्यातील मोहितला काही कळेना. कार्यक्रमात बक्षीस म्हणून पुस्तकाचा एक संच मिळाला ‘जादूगार फकीर आणि इतर कथा’ आणि बरीच पुस्तके. रस्त्याने निघताना आजोबांनीसुध्दा तोंडभरून कौतुक केले आणि केसावरून कितीतरी वेळा हात फिरविले. घरी आल्यावर सर्व पुस्तके वाचून पूर्ण केल्याशिवाय मोहितला चैन पडेना. घरी येणारी पाहुणे मंडळी मोहितकरीता पुस्तके आणू लागली. आता मोहितचे विश्व म्हणजे पुस्तक झाले.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी, उमरेड रोड,नागपूर
========



