सौ. वसुधा वैभव नाईक यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
सौ. वसुधा वैभव नाईक यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: (दि ५) लायन्स क्लब ऑफ,पुणे- धनकवडी आणि श्रीराम योगसाधना, धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
5 सप्टेंबर हा शिक्षक दिन यानिमित्ताने 4 सप्टेंबर 2025 च्या मावळतीला लायन्स क्लब व श्रीराम योगसाधना यांच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून सौ. वसुधा वैभव नाईक यांच्यासह एकूण 26 मुख्याध्यापक,शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला.
यावेळी उपस्थित असणारे लायन्सचे विविध पदाधिकारी मा.राजेशजी अग्रवाल,ला. श्रेयसची दिक्षीत, ला. सलील कारखानीस, ला. सुनीलजी भट, ला. भानुदास पायगुडे, ला. फुलचंद चाटे, निलांबरी बहादरपुरे, रवींद्र साधूल, ला. सुनील जगताप, ला. संगीता वेताळ, ला. पंडित पतंगे इत्यादी मान्यवरांनी आदर्श मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा सत्कार केला.
ला. राजेशजी अग्रवाल यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक सेवा कशी घडते हे सांगितले.
ला. सुनील जगताप यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
रवींद्र सादूल यांनी श्रीराम योग साधना बद्दल माहिती सांगितली. निलांबरे बहाद्दरपुरे यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले व स्वतः शिक्षक होत्या त्यावेळी त्यांचे दिवस कसे होते त्याचे काही क्षण कथन केले.
मा. कीर्ती पंडित यांनी स्वतःचा शिक्षक ते मुख्याध्यापक प्रवास कथन केला.मोजक्या मुख्याध्यापकांचे कार्यक्रमाबाबतचे मनोगत झाले.ला. संगीता वेताळ या स्वतः कवयित्री व लेखिका आहेत त्यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.कार्यक्रम बहारदार झाला. कार्यक्रमानंतर उत्तम जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला.



