Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शब्द सारे संपले आता; विष्णू संकपाळ

0 4 0 9 0 3

शब्द सारे संपले आता

शब्दांनीच जोडली मने
शब्दांनीच तोडली बंधने
शब्दातीत आपले गुंतने
एक झाली ह्रदय स्पंदने…//

जाणते अजाणतेपणी
घातली मी शब्द साद
जाणूनी ते हळवे भाव
दिलास मला प्रतिसाद.. //

उमटला तो शब्दध्वनी
ह्रदयगाभारी मधूर नाद
त्याच मंद मंद कंपणात
छेडला धुंद शब्द संवाद.. //

मंत्रमुग्ध असे लुब्ध मन
जसे भ्रमर वेधी पुष्पगंध
ओढ म्हणू की वेड म्हणू
उधळले नाना शब्द रंग.. //

रंगलीस तू या शब्दरंगी
दंग झालीस भान हरपूनी
शब्दजादूची ही अनुभूती
आंतर्बाह्य गेलीस हरखूनी.. //

शब्द सारे संपले आता
थोडे बोलूया स्पर्शातून
कोडे खोलूया हळूवार
आणि डोलूया हर्षातून.. //

दुःख सारे जावे विरून
असे हसू तुला देईन मी
सुख पुन्हा यावे फिरून
सखे आसू तुझे घेईन मी… //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
============

1.5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे