हिंगण्यात हलक्या व मध्यम स्वरूपात बरसल्या सरी
तो' आला, बरसला , निघूनही गेला

हिंगण्यात हलक्या व मध्यम स्वरूपात बरसल्या सरी
‘तो’ आला, बरसला , निघूनही गेला
वीजेचा लपंडाव सुरू
हिंगणा शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
हिंगणा: (दि २३) नागपूर ग्रामीणमधील हिंगणा तालुक्यात सर्वदूर मध्यरात्रीनंतर पहाटे ४.०० च्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी बरसल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज ग्रामीण भागात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होणार नसल्याचे चित्र आहे.
पावसाने लावलेल्या हजेरीने हिंगणा वानाडोंगरी परिसरातील पहाटे वीज गायब झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोंढा येथील कांचनगंगा सोसायटीत वीजेचा लपंडाव सुरू असून, जीवित हानी होऊ नये म्हणून वीज बंद केली असल्याचे महावितरणनी सांगितले.



