सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ‘राजेश म्हात्रे’ यांना पोलीस महासंचालक पदक
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ‘राजेश म्हात्रे’ यांना पोलीस महासंचालक पदक
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग :(दि ६ मे) महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कर्तव्याचा दक्ष आणि सेवाभावाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक शिलेदारांचा दरवर्षी सन्मान केला जातो. सन 2025 च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदकावर रायगड पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेले व सध्या महामार्ग पोलिस मदत केंद्र वाकण येथे वाहतूक विभागात कार्यरत असलेले राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे उर्फ राजा म्हात्रे यांनी आपले नाव कोरले आहे. नवी मुंबई येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे (आयपीएस) यांच्या हस्ते राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे यांना हे पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील आवास या गावातून पोलीस दलात दाखल झालेल्या राजेश म्हात्रे यांचा 31 वर्षांचा सेवाकाळ म्हणजे शिस्त आणि कष्टाचा चालता-बोलता इतिहास आहे. खाकी वर्दीची शान राखताना त्यांना मिळालेली बक्षिसे हा केवळ आकडा नसून, त्यांच्या प्रामाणिकपणावर उमटलेली सरकारी मोहोर आहे. राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे यांची ओळख राजा म्हात्रे अशी असून केवळ एक पोलीस म्हणून नाही, तर एक चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचा हा सन्मान झाल्या मुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.



