कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
चित्रांची दुनिया; विष्णू संकपाळ
0
4
8
2
9
7
चित्रांची दुनिया
मनास मोहिनी घालणारी
मनोहारी चित्रांची दुनिया
निर्मिकाच्या कुंचल्याची
जणू अजब गजब किमया.. //
तरलेय कसे कळत नाही
आधारावाचून आभाळ
अगणित ग्रह तार्यांची
त्यावर विलोभनीय माळ.. //
धीर गंभीर विशाल सागर
नाना आश्चर्याचेच आगार
मात्र किनार्याची मर्यादा
त्याने कधी ना केली पार.. //
ना जाणो कसा वर्णावा
या धरतीचा चित्र पसारा
हिरव्या गार वनराईचा
नाचतेय फुलवून पिसारा.. //
उंच पर्वत खोल दर्या
नद्या वाहतात भरभरून
फुलतो फळतो हा निसर्ग
शेत शिवार येतेय बहरून.. //
घनदाट वने सपाट मैदाने
कमाल चित्र जीवसृष्टीचे
सूक्ष्म कुणी विशालकाय
हे अद्भूत धोरण दूरदृष्टीचे… //
येथे एकाच हाडा मांसाचे
कोटी कोटी बनवले पुतळे
पर रक्ताचा एक रंग लाल
रंग, रूप, गुण वेग वेगळे… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि छ. संभाजीनगर
===========
0
4
8
2
9
7



