शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरच
मुख्य संपादक: राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*
*☄विषय : तेजस्विता☄*
*🍂शनिवार : ०८ / अॉगस्ट/ २०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*तेजस्विता*
झळकू दे तेजस्विता तुझीच
दाखवून दे प्रखर बुद्धिमत्ता
अन्याय अत्याचाराचा विरोध
कडाडून करावा न जुमानता
दिव्यतेज ज्ञानाच्या बळावर
आत्मविश्वास ढळू देऊ नको
प्रतिकार कर अन्याय विरूध्द
म्होरं असो कुणी भिऊ नको
ऊठ तरुणा आता जागा हो
लोकशाहीचा अतूट धागा हो
संवैधानिक मूलभूत अधिकार
वापराचा सुजाण नागरिक हो
जागव तुझ्यातली आत्मशक्ती
दिपवून टाक तिमिर दाटलेला
भविष्य तुझे तुज हाती आहे
योग्य मार्ग असेल निवडलेला
प्रेरणा घेऊन महापुरूषाकडून
कर प्रहार इथल्या व्यवस्थेवर
अन्यायाला वाचा फुटेल अन्
गदा आणणार नाही हक्कावर
अडवणूक होईल ही पदोपदी
परी माघार कधी तू घेऊ नको
शिक्षण वाघिणीचे दूध प्राशन
डरकाळी तुझी रे विसरू नका
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
जीवनातील अंधाराच्या वाटेवरती
मुली तू दीप बनुनी अंधारातही चाल
वादळ आले कितीही तुझ्या मनात
उरी ठेव तू नित्य धैर्याची मशाल….
काळोख कितीही दाट असुदे
आशेचा एक किरण वाट शोधत येतो
मनातील विश्वासाचा दीप पेटता ठेव
तोच आपल्याला नवी दिशा दाखवून देतो….
पावलांना काटे टोचले तरीही
थांबू नकोस मुली तू क्षणभर
मेहनतीच्या, कष्टाच्या घामातूनच
फुलेल यशाचा सुंदर, मनमोहक डोंगर…
मुली तुझ्या स्वप्नांना दे पंख नवे
नवीन पंखाने आकाशाला गवसणी घाल
तुझ्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळू दे
तुझी समाजातील उत्तम चाल…
तूच शक्ती, तूच प्रेरणा, तू विश्वास
तूच आशेचा किरण आहे समाजाचा
तुझ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वानेच
फुलू दे कर्तव्याचा आलेख जीवनाचा….
स्वतः जळून दीप बनावे माणसांसाठी
दुसऱ्यांच्या वाटा उजळून टाकाव्यात
अशीच तुझी तूच तेजस्विता आहेस
जगण्याला तुला तुझ्या नव्या दिशा मिळाव्यात…
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
तेजस्विता अंतर्मनाची
विचारांची नी मूल्यांची
देते झळाळी जीवनाला
व्यक्तीमत्व आकाराची
सत्यव्रत जीवनात सदा
करते असत्यावर वार
निखरते जीवन अधिक
करता मूल्यांचा स्विकार
सात्विक वृत्तीने मिळते
सुख,शांती,समाधान
अपेक्षांना घालून बंध
तेजस्वी होई जीवनमान
नको कुठलीही लालसा
कुणाचाही द्वेष मत्सर
तेजाचा होतो संचार
द्वंद संपते मनाचे सत्वर
तेजस्विता अंतर्बाह्य
जीवनाचे होई कल्याण
षड्रिपूवर मात करून
वाढे जीवनाचा सन्मान
नको लाचलुचपत
नको भ्रष्टाचारी वृत्ती
संयमाने जीवन जगता
होते जीवनाची प्रगती
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*तेजस्विता*
देवीचे अस्तित्व । तुझ्या ठायी आहे ।
डोकावूनी पाहे । अंतरंगी ॥१॥
ममता वात्सल्य । अष्टभुजा रुप ।
देवीचे स्वरूप । तुझ्यामध्ये ॥२॥
क्षेत्र ते कुठले । नसे अवघड ।
डोंगर हा चढ । प्रगतीचा ॥३॥
अस्तित्वाचा लढा । जिद्दीने लढला ।
झेंडा तो रोवला । कतृत्वाने ॥४॥
तपश्चर्या असे । हा नारी जन्म ।
व्रतस्थ आजन्म । सेवेसाठी ॥ ५ ॥
तेजस्विता नारी । कुळा उद्धरेल
जना सुधारेल । शिक्षणाने ॥ ६ ॥
रामसूता सांगे । जागर शक्तीचा ।
वसा सावित्रीचा । आहे थोर ॥ ७॥
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
तिमिरातूनी तेजाकडे
नवी पहाट हाक देई गडे
तेवत ठेव अग्नी मशाल
तेजस्विता घेऊन ढाल||
संकल्पाचा हा दृढ प्रहार
उन्हात सावलीचा आधार
कर्तव्य आणि निष्ठेची ज्योत
संकटावरही करून मात||
ह्रदयात भरून असीम धैर्य
घे हातात नवे पहाट कार्य
उठ चल ओळख स्वताला
भिऊ नकोस तु कुणाला||
तुच प्रकाशाचीआहे सरीता
म्हणेल जग तुला तेजस्विता
स्वप्न कर तुझे तू पूर्ण
महाभारताचा होऊन कर्ण||
अजिंक्य हो अजरामर
कर्तव्याचा तुझ्यावर भार
हो ईतकी तु महान
तेजस्विता हाच खरा स्वाभीमान||
*रंजना राहूल ब्राम्हणकर*
*अर्जूनी/मो.जि.गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
अन्यायाला न घाबरता
टाक पुढे पाऊल
तेजस्विता तू
लागेल नव्या पहाटेची चाहूल
जरी घोंघावतील भोवताली
वादळे अत्याचाराची
कर धैर्याने वार
उगवेल पहाट नव्या युगाची
झाशीची राणी तू
तळपू दे तुझी तलवार
अन्यायाचा प्रतिकार करण्या
कर अत्याचारावर वार
विश्वासाने स्वतःच्या
उजळू दे आयुष्याची वाट
प्रयत्नांचे पंख लेवून
मिळव यशाचा थाट
डोळ्यातल्या आसवांना
स्वप्नांची साथ दे
संकटाच्या पहाडांना
धैर्याने मात दे
*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
सत्य परोपकार विनम्रता
कणखर बाणेदार निर्भयता
असतात गुण जिच्या अंगी
असते खरी ती तेजस्विता
निडरता धडाडी असते अंगा
जोखीम पत्करून देते ती मात
भल्या भल्यांची लावते जी वाट
सत्यअनुसरून देते ती हाक
मेकअप शेकअप करुनी
उजळविणारे चेहरे बदलती
क्षणोक्षणी शृंगारा मागे खरी
विद्रुपता असते ती ठाई ठाई
मायावी रूपाला भुलतात भले
चमकते रूपच असते पुढे
चित्र सारे स्पष्ट होता अडकले जरी
चक्रात सावरते ती तेजस्विता
तेजस्वितेच्या भाळी नसते
छद्मी छटा अंतरीच्या शुभ्रतेने
सावरते ती अवघड बला
धीर एकवटून लढते सदा
*गजवंती सुभाष विघ्ने*
*बडनेरा ,अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
काळोखाच्या कुशीतही, चांदणे जपायचे असते,
विझलेल्या स्वप्नांच्या राखेत, फूल उमलवायचे असते।
वादळांच्या तांडवातही, दीप तेवत ठेवायचा असतो,
हरवलेल्या वाटेवरती, ध्रुवतारा शोधायचा असतो।
काट्यांच्या सहवासातून, सुगंध वेचायचा असतो,
अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून, मोती घडवायचा असतो।
पराभवाच्या सावलीला, धैर्याने सामोरे जायचे असते,
पडलेल्या प्रत्येक पावलाला, पुन्हा उभे करायचे असते।
स्वतः जळून वाटसरूंच्या, वाटेवर प्रकाश व्हायचे असते,
माणुसकीच्या स्पर्शाने, दुःखाचे ढग विरघळायचे असते।
नाही मुकुट, नाही टाळ्या, कर्मच आपले दागिने असतात,
सत्याच्या वाटेवर चालणारे, पाऊलच खरे तेजस्वी असते।
अंधाराला शरण न जाता, पहाट स्वतः व्हायचे असते,
मनातला सूर्य जागवून—‘तेजस्विता’ बनायचे असते!
*संदिप कासारे*
*सिलवासा दा. न. हवेली*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
भीम तेजस्विता , सूर्यास झाकणारी!
एक भारत रत्न , वंचितास कैवारी!!
अज्ञान अंधश्रद्धा ,गाडली विषमता !
प्रज्ञेने उगवला , घरोघरी अंधारी !!
माणूस माणसास , भुलून वागताना !
बुध्द मनी पेरुन , शुद्ध केले विकारी !!
जातीयता धर्मास ,उरला नाही थारा !
हिंदू मुस्लिम झाले , समतेचे पुजारी !!
आज वादळ वारे , झेलून छातीवर!
तुफान आले तरी , घेई उंच भरारी !!
पराभव संकटे , जरी आली जीवनी!
आनंदाने नांदती , माय बहीण नारी!!
राज्यघटना तुम्ही,एकदा वाचून घ्या !
धर्मग्रंथ तुझारे , नाही तुला ऊध्दारी !!
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि, यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
ती माझी तेजपुंज
शांत इवलीशी पणती
तेजस्विता देते मंद
आग ठेवून,मनी धगधगती ॥१॥
स्वत:ला ही ती
जाते,विसरूनी
जनाला प्रकाशमय करूनी
अंधारात निघते,नाहुनी ॥२॥
ती माझी,तेजस्वी
सान पणती
आग ओकत धुंद
राहते,जनात पेटती ॥३॥
देते,सकलां तेजस्विता
सोनुली,आग सोसुनी
मनाच्या आकांक्षा,
मनात तशाच ठेवूनी ॥४॥
स्वत्वाला समर्पित करून
देते संदेश मोलाचा
समर्पणाचा लोकांना
आहे तो महत्वाचा ॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
संघर्षाच्या दिव्यात तिने
ज्ञानाची ज्योत पेटवली,
दगडगोटे सोसले पण
शिक्षणाची वाट नटवली…
मानवतेची दिशा दाखवू
निश्चय तिने आखला,
जातीभेद नका करू
समानतेचा मार्ग दाखवला…
स्वावलंबी केलं मुलींना
कर्मठ लोकही हारली,
अन्यायाच्या छाताडावर बसून
पहिली शिक्षिका ठरली…
ज्ञानाची ती आई
जणू सावित्री बाई,
तेजस्विता या लेखनाची
खूपच प्रेरणादायी…
शाळेच्या मंदिराला
ज्ञानाची फुले वाहिली,
तेजस्विता त्या सावित्रीची
अजूनही झळकत राहिली…
*कू. साक्षी दत्तात्रय देसाई, दौंड, पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
प्रखर तेज ओसंडून वाहे
जिजाऊच्या मुखमंडलावरी
कर्तृत्वाची असे तेजस्विता
हिंदवी साम्राज्यावरी
स्वप्नाची पूर्ती करण्या
बाल शिवाजीस संस्कारीले
शूर वीरांच्या गोष्टी सांगून
शिवाजीस घडविले
तेजस्विता असे माऊली
नाव असे जिजाऊ
मराठी साम्राज्य ऊभे करण्यास
शिवाजीस केले लढाऊ
गुलाम गिरीत होते राष्ट्र
लढा दिला शिवरायानी
मुक्त केले महाराष्ट्राला
गुलामी चक्रातुनी
धन्य असे ती तेजस्विता
महाराष्ट्राची तू भाग्यविधाता
वंदन करतो तुज जिजाऊ माता
शौर्याची तू अमर गाथा
*श्री.पुरुषोत्तम वि ठोंबरे*
*झिंगाबाई टाकळी,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
कणखरतेने नाकारून
पुरूष धार्जिणी संहिता
उजळून दाखव गगन
बनून प्रखर. तेजस्विता.. //
घैऊन प्रसंगी तलवार
लढलीच ना जिजाऊ
लाख विरोध झुगारून
बघ तळपली ना साऊ.. //
निर्बंध कालही आजही
लिखित कुठे अलिखित
बल बुद्धीच्या जोरावर
तूच बदल तुझे भाकित.. //
आधी व्यक्ती मग नारी
व्यक्तित्व दिसू दे उठून
जेथे अन्याय अत्याचार
तेथे ऊठ त्वेषाने पेटून.. //
किती लोटली युगे तरी
नाहीच लोपली निती
पुरूषी नजरेत अजून
डोकावते विखारी वृत्ती ..//
भिडवून नजरेला नजर
ओळख त्यातले कपट
समशेर बनूनी तात्काळ
अशा विकृतींना निपट.. //
होवूनी गंगा भागिरथी
किती धूशिल यांचे पाप
बनूनी दुर्गा चंडिका तू
टाक पदरात त्यांचे माप.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
*तेजस्विता*
नारी गे तव शक्ती अपार
सोसलास अन्यायाचा प्रहार
ऐअंतरात तव वन्ही चेतला
तेजस्विता गं तव अपार
मनस्विनी तूच लिही गं
कर्तृत्वाचा इतिहास नवा
स्वयंसिद्धा तू एकटी भारी
कुणाचा तुज आधार हवा?
जोखड ते जुन्या रुढींचे
पायी तुझ्या जे जखडले
तोडून टाक निर्भयतेने
दिसती बघ ती प्रकाश फुले
निर्भयांचा बळी घेणारे
लांडग्यापरी जगी माजले
तया शासन करी रागिणी
स्वयंसिद्धा तू गं प्रज्वले
नको राहू तू मूर्ती बनूनी
नको भुलू तू स्तुतीसुमना
रुप घेवूनी अष्टभुजेचे
सिध्द होई असुरमर्दना
पंख पसरून घेई भरारी
नभ निळाईत क्षितीजा पार
प्रगतीचा आलेख उंचावत
यशोशिखरी होशी स्वार
तू मायमाऊली प्रेमसागर
पत्नी होता घेसी कुटुंब भार
मुलांना ज्ञान संस्कार देसी
पिढी घडविसी तेजतर्रार
नारीशक्तीचा विजय जाहला
दिशादिशांत गाथा गाजली
कर्तृत्वाचे पंख लेवूनी तिने
क्षितीजे किती काबीज केली
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌈☀️🌈♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



