Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

काळीज

नरेंद्र गंगाराम साबळे ता. गंगाखेड, जि. परभणी

0 5 3 4 0 0

काळीज

माय माय म्हणून
तोंड पडल शाबुद
गोड ऊसाची नाबुद…!

दु:खाचा ग कडेलोट माय शब्द
पुट-पुट… काळ जाई लांब -दूर
माय-लेकराची ताटातूट बघून
काळ होई दिक….!

माय ममतेचा सागर…
माय समतेचाआधार…!
राणा-वनातून झेप तिची
बाळाकड…!

माय प्रेमाचा कलोळ
माय साखर गोड
माय विन… लेकरू
पोरकं… पोरकं..!

माय मातीचा ग खेळ
माय अमृत बोल
माईचं काळीज
बाळापायी तळमळ..!

माय गंगेची ग धार …
माय कवडी, शिपचा डाव…!
माय शिन-भागाचा विसावा
माय चैतन्यचा ग गाभा…!

माय लेकराचं ग नाते
जसे अनमोल रत्न ;
देवालाही वाटे हेवा
घेई वारंवार अवतार

नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि. परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे