Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासमध्ये रांगोळी प्रदर्शन संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 6

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासमध्ये रांगोळी प्रदर्शन संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: (दि. २४ डिसेंबर): आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी यथोचीत स्वागत केले. रांगोळी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्या सुहासिनी सुरेश राणे यांनी केले. उद्‌घाटन प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत, आवास सदस्या सोनाली माने, संचिता राऊळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसेच आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष जयंत चेऊलकर, खजिनदार सुवर्ण कांबळी, सभासद अनिल राऊळ, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर प्रतिनिधी तथा स्नेहसंमेलन अध्यक्ष गणेश राणे सर,
स्नेहसंमेलन उपाध्यक्ष नथुराम म्हात्रे सर, सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रांगोळी प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

रांगोळी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी पल्लवी पाटील मॕडम, दिव्या भगत मॕडम, प्रिती कवळे मॕडम व शतदा म्हात्रे मॕडम यांनी अतिशय सुंदर असे नियोजन केले होते. स्पर्धेमध्ये इ. ५ वी, ६ वी गटासाठी फूल किंवा पक्षी, इ. ७ वी, इ. ८ वी गटासाठी लेक वाचवा किंवा निसर्ग रांगोळी, इ. ९ वी १० वी गटासाठी जल संवर्धन काळाची गरज किंवा भारतीय संस्कृती व सण तर इ. ११ वी, इ.१२ वी गटासाठी माझी वसुंधरा किंवा राष्ट्रीय एकात्मता हे विषय देण्यात आले होते.

रांगोळी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दिलेल्या विषयावर अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या. श्री. स.म. वडके विद्यालय, चोंढी – किहीमचे कला शिक्षक केदार पाटील सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

*स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे–*
*इ. ११ वी, इ. १२ वी गट*–
*प्रथम क्रमांक-* धैर्या गावंड [ इ.११ वी वाणिज्य ]
*द्वितीय क्रमांक-* सृष्टी मढवी [ इ.११ वी वाणिज्य ]
*तृतीय क्रमांक-* सृष्टी वाघमारे [ इ.११ वी वाणिज्य ]
*उत्तेजनार्थ -* रिया अमोल पाटील [ ११ वी कला ]

*इ.९ वी, १० वी गट*–
*प्रथम क्रमांक*– श्वेता मिश्रा [ इ.९ वी अ ]
*द्वितीय क्रमांक*– ईश्वरी कोळी [ इ.१० वी अ ]
*तृतीय क्रमांक*– अंजली भगत [ इ.९ वी अ ]
*उत्तेजनार्थ -* पायल म्हात्रे [ ९ वी अ ]
*इ. ७ वी, इ. ८ वी गट*–
*प्रथम क्रमांक-* आर्या म्हात्रे [ इ.८ वी अ ]
*द्वितीय क्रमांक-* दक्ष घरत [ इ. ७ वी ]
*तृतीय क्रमांक-* सृष्टी पाटील [ इ. ८ वी अ ]
*उत्तेजनार्थ -* साईश मयेकर [ इ.७ वी ]

*इ. ५ वी, इ. ६ वी गट*–
*प्रथम क्रमांक*– मनवा वाडकर [ इ. ५ वी ]
*द्वितीय क्रमांक*– गार्गी पाटील [ इ. ६ वी ]
*तृतीय क्रमांक*– साईशा राणे [ इ.५ वी ]
*उत्तेजनार्थ -* सैयाली कोळी [ इ. ५ वी ]

स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे